सह्याद्री इंग्लिश मिडियम स्कूलचे इंटरनॅशनल जनरल नॉलेज ओलंपियाड मध्ये उल्लेखनीय यश

सांगोला – सह्याद्री इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सायन्स ओलंपियाड तर्फे घेण्यात आलेल्या इंटरनॅशनल जनरल नॉलेज ओलंपियाड मध्ये उल्लेखनीय यश संपादन करून शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.
प्रशालेतील ,धांडोरे मिस्का चंद्रकांत (इयत्ता दुसरी) हिने उत्कृष्ट कामगिरी करत एक्सलन्स ऑफ गोल्ड मेडलिस्ट हा बहुमान मिळवला आहे.
तसेच शालेय क्रमवारीत ही पुढील विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे.
बंडगर विभावरी विनायक, भाकरे युगंधर प्रसाद, चक्रवर्ती राज अपू, काटे आर्या राहुल, वगरे धनश्री अनिल, दौंडे सार्थक अमर, खातीब अहमद आसिफ, भोरे अथर्व राजेंद्र, पवार ऋतूजीत मंदार, कटकर विनय विजय, जांगळे
अभिनव चंद्रकांत या विद्यार्थ्यांनी ही उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
या सर्व विद्यार्थ्यांचे व्यवस्थापिका सौ. अनिता इंगवले, मुख्याध्यापक प्रमोदिनी जाधव, सर्व विषय शिक्षक आणि पालकांनी अभिनंदन करून त्यांना पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या
आहेत.



