एस.टी.सवलतीचा ज्येष्ठ नागरिकानी लाभ घ्यावा- पोफळे

महाराष्ट्र शासनाच्या एस.टी.महामंडळाने सर्वसामान्य जनते साठी सुखकार व आरामदायी प्रवास होण्या साठी अनेक योजना लागू केल्या आहेत..बहुजन हिताय,बहुजन सुखाय या उक्तीप्रमाणे एस.टी.चे कार्य सुरू असुन सांगोला आगाराने शासनाने लागू केलेल्या सर्व सुखसोयी व सुविधा देण्याचे व्रत अंगिकारले आहे…त्यामुळे सांगोला तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांनी आगार देत असलेल्या सवलतीचा लाभ घ्यावा,असे आवाहन सांगोला एस.टी.आगाराचे प्रमुख विकास पोफळे यानी केले..
सांगोला शहरातील ज्येष्ठ नागरिक व उद्योजक अरुण पाटील व दिपक चौथे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला,त्यावेळी ते बोलत होते…सांगोला शहरातील सांगोल विद्यामंदिर प्रशालेतील जे विद्यार्थी आज वयाच्या पासश्ठीपार आहेत व एस.एस.सी.- 75 पहिल्या बैचचे विद्यार्थी आहेत,त्यानी एकमुक्कामी कोकण सहलीचे आयोजन केले होते…ती सहल यशस्वी व सुखकारक झाल्या बद्द्ल मित्रमंडळीच्या वतीने आगारप्रमुख पोफळे यांचा सत्कार करण्यात आला…नविन कोरी करकरीत लालपरी गाडीने व चालक रसुल मुलाणी यांच्या सहजसुंदर ड्रॉइव्हिन्गने प्रवास सुरक्षित व सुखकर झाल्याब्द्द्ल मुलाणी यांचा सहलीदरम्यान सत्कार करण्यात आला..या वेळी एस.टी.कर्मचारी बुरुंगले व अन्य उपस्थित होते..प्रा.राजेंद्र ठोंबरे यानी आभार मानले..



