महाराष्ट्र

सांगोला विद्यामंदिरचा कॅडेट ओम हंबीरराव ठरला सुवर्ण पदकाचा मानकरी

 

सांगोला (वार्ताहर) दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या ऑल इंडिया थलसेना कॅम्पमध्ये सांगोला विद्यामंदिर प्रशालेचा एनसीसी कॅडेट सार्जंट ओम लक्ष्मण हंबीरराव याच्या महाराष्ट्राच्या फायरिंग टीमला गोल्ड मेडलने सन्मानित करण्यात आले.

दरवर्षी एनसीसी विभागामार्फत दिल्ली येथे ऑल इंडिया थलसेना कॅम्पचे आयोजन करण्यात येते. यावर्षी 2 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये दिल्ली येथे एनसीसीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आलेले होत्या, यामध्ये रायफल शूटिंग या स्पर्धेत महाराष्ट्र डायरेक्टे्टला गोल्ड मेडल मिळाले यामध्ये सांगोला विद्यामंदिर प्रशालेच्या सार्जंट ओम लक्ष्मण हंबीरराव याने ग्रुपिंग फायर मधून स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. त्याला यामध्ये गोल्ड मिळेल प्राप्त झाले.
38 महाराष्ट्र बटालियन एनसीसी सोलापूर अंतर्गत सांगोला विद्यामंदिर प्रशालेमध्ये एनसीसी विभागामार्फत सलग चार वर्षे दिल्ली गाठण्याचा हा बहुमान मिळवला.
सेकंड ऑफिसर मकरंद अंकलगी व थर्ड ऑफिसर उज्वला कुंभार यांच्या अनुभव संपन्न व विशेष मार्गदर्शनाखाली सलग चार वर्षे सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे एनसीसी कॅडेट दिल्ली येथे आपला नावलौकिक संपादन करून येत आहेत.
पुणे ग्रुप मधून रायफल शूटिंगमध्ये ज्युनियर डिव्हिजनमधून केवळ ओम लक्ष्मण हंबीरराव (इयत्ता नववी इ) याची निवड झाली होती.

ओमच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, खजिनदार शंकरराव सावंत, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, संस्था कार्यकारिणी सदस्य विश्वेशजी झपके, सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे प्राचार्य अमोल गायकवाड, उपमुख्याध्यापक चिंतामणी देशपांडे, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, पर्यवेक्षक उत्तम सरगर, प्रदीप धुकटे व काकासाहेब नरूटे, विद्यामंदिर परिवारातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच 38 महाराष्ट्र बटालियन एनसीसी सोलापूरचे कमांडिंग ऑफिसर एम.डी मुथ्थप्पा, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर देवानंद, लेफ्टनंट अरुणकुमार ठाकूर आणि सर्व एनसीसी ऑफिसर्स यांनी अभिनंदन करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button