महाराष्ट्र
फॅबटेक इंजिनिअरींगमध्ये ‘टेक्नो – फॅब २ के २५’ राष्ट्रीय तांत्रिक परिसंवाद स्पर्धेचे आयोजन

सांगोला : फॅबटेक एज्युकेशन सोसायटी संचलित, फॅबटेक टेक्नीकल कॅम्पस, फॅबटेक कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अँड रिसर्च सांगोला ही संस्था अभियांत्रिकी शिक्षणातील एक अग्रगण्य संस्था आहे. संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे तांत्रिक शिक्षण दिले जाते. संस्थेने यापूर्वीही अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले आहे. या स्पर्धेचे महत्त्व म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांचे तांत्रिक ज्ञान आणि कौशल्ये प्रदर्शित करण्याची संधी मिळेल व विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील तज्ञांशी संवाद साधण्याची संधी आणि नवीन तंत्रज्ञान आणि नवकल्पना ची माहिती मिळेल. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल. यासाठी तंत्रज्ञान आणि नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी फॅबटेक टेक्निकल कॅम्पस , कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड रिसर्च मध्ये ‘टेक्नो-फॅब २ के २५’ या राष्ट्रीय तांत्रिक परिसंवाद स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा ४ एप्रिल २०२५ रोजी येथे होणार आहे. अशी माहिती फॅबटेक कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अँड रिसर्चचे प्राचार्य डॉ. रवींद्र शेंडगे यांनी दिली.
या स्पर्धेचा मुख्य उद्देश देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांमधील तांत्रिक कौशल्ये आणि नवकल्पनांना प्रोत्साहन देणे हा आहे, यामध्ये संस्थास्तरीय कार्यक्रम – ड्रोन डिझाइन, वेबसाइट डिझाइन,प्रकल्प स्पर्धा, स्थापत्य अभियांत्रिकी – नैसर्गिक एसी असलेली निवासी इमारत , पुल डिझाइन , कॉम्पुटर सायन्स अभियांत्रिकी आणि ए.आय.डी.एस अभियांत्रिकी – चॅटबॉट विकास,कोड मॅनिया,बीजीएमआय गेमिंग , मेकॅनिकल अभियांत्रिकी – आधुनिक शेतीसाठी स्मार्ट सोल्युशन ,कॅडवॉर , मिलेथ , इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी – सर्किट फेस्ट बिगिनर , सर्किट फेस्ट एक्सपर्ट ,टेक्नो कोडिंग , इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी – सर्किट बनवणे आणि डीबगिंग या स्पर्धेसाठी राज्यातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांतील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. नाव नोंदणीसाठी ए.आय.डी.एस – प्रा.जे.व्ही.मदने – ९८३४१०१४९९ , सिव्हील इंजिनिअरिंग – प्रा.एस. व्ही. जगताप – ८२७५२०८८२३, कॉम्पुटर सायन्स इंजिनिअरिंग – प्रा.जी.जी.काळे – ९४२२१२८६७९ , ई.एन टी सी इंजिनिअरिंग – प्रा.आर.एन. देशमुख- ७७०९०२८४४५ , मेकॅनिकल इंजिनिअरिंग प्रा.पी.पी. पावसकर – ९४२२४३२०६२, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग- प्रा. पी.एम.बिले- ९८९००८५०४१ यांच्याशी संपर्क साधावा.
स्पर्धेत उत्कृष्ट प्रकल्प सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे आणि प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत.व विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात येणार आहेत., अधिक माहितीसाठी संस्थेच्या ८४०८८८८६५७ या क्रमांकावर संपर्क साधावा,असे फॅबटेक कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अँड रिसर्च सांगोला , टेक्नो – फॅब २ के २५’ चे समन्वयक प्रा. आशिष जोशी यांनी सांगितले.



