चोरट्यांनी पळविले 2 लाखांचे सोन्याचे दागिने
सांगोला(प्रतिनिधी):- अज्ञात चोरट्याने उघड्या घरात प्रवेश करुन 2 लाख 4 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने चोरुन नेले असल्याची घटना दि. 14/04/2024 रोजी रात्रीच्या सुमारास अकोला ता.सांगोला येथे घडली आहे. चोरीची फिर्याद विक्रमसिंह लिगाडे (रा. अकोला) यांनी सांगोला पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे.
चोरट्यांनी 1 लाख 20 हजार रुपये किंमतीचे 3 तोळ्याचे गळ्यातील गंठण, 20 हजार रुपये किंमतीची अर्ध्या तोळ्याची सोन्याची अंगठी, 20,000/- रु किंमतीची अर्ध्या तोळ्याची सोन्याची अंगठी, 28 हजार रुपये किंमतीचे कानातील 7 ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुबे व 16 हजार रु किंमतीचे सोन्याचे 4 ग्रॅम वजनाचे ठुसे असा एकूण 2 लाख 4 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेली असून पुढील तपास सपोनि जगताप करीत आहेत.त्याचप्रमाणे विष्णु जगन्नाथ लिगाडे यांचे घरी देखील चोरी झाली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.