महाराष्ट्र
सांगोला: चक्कर येऊन पडल्याने एकाचा मृत्यू

सागोला:चक्कर येऊन पडल्याने एकाचा मृत्यू झाला असल्याची घटना 19 ऑगस्ट रोजी वाकी-शिवणे ता. सांगोला येथे घडली.भगवान दौला पारसे (वय 50 वर्षे रा. वाकी शिवणे, ता. सांगोला जि. सोलापुर )असे मृत्यू पावलेल्या इसमाचे नाव आहे.
याबाबत सांगोला पोलीस स्टेशन कडून मिळालेली माहिती अशी की, भगवान पारसे हे दि.19/08/2025 दुपारी 3 वा. चे सुमारास यांना चक्कर येवुन पडले.होते. त्यावेळी त्याचा मुलगा विशाल याने ग्रामिण रुग्णालय सांगोला येथे त्यांना उपचारास दाखल केले होते. डॉक्टरांनी उपचार करण्यापुर्वी ब्रेन डेड झाल्याने मयत झाले असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. अकस्मात मयत सांगोला पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोना जाधव हे करीत आहे. फिर्याद वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय सांगोला यांनी दिली आहे.



