नाझरा (वार्ताहर):- सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नाजरा विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमध्ये आज माजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न झाला.
ओंकार राजकुमार पाटील याने MBBS ही पदवी संपादन केल्याबद्दल तसेच कुमारी पल्लवी शिवाजी मिसाळ (Excise Police) मंगळवेढा या ठिकाणी निवड झाल्याबद्दल प्रशाला व ज्यु.कॉलेजचे प्राचार्य बिभीषण माने,पर्यवेक्षक मधुकर धायगुडे हस्ते व ज्येष्ठ शिक्षक विनायक पाटील सर व पालक यांच्या उपस्थितीत सत्कार संपन्न झाला.
सत्काराला उत्तर देताना ओंकार पाटील म्हणाले की इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत येथील शिक्षकांनी मला घडवल्यामुळेच आज मी तुमच्यासमोर डॉक्टर म्हणून उभा आहे.प्रत्येक विद्यार्थ्यांकडे अगदी बारकाईने लक्ष देऊन त्यांच्या गुणांचा विकास करणारी ही शाळा मला भेटली हे मी माझे भाग्य समजतो.
सत्काराला उत्तर देताना पल्लवी मिसाळ म्हणाली की आपल्या जीवनात परिस्थिती कशीही असो मनात जिद्द असेल तर यशस्वी नक्कीच होता येत. या प्रशालेतील शिक्षकांनी मनामध्ये पेरलेली जिद्दच मला एका चांगल्या पदापर्यंत घेऊन गेली. खडतर परिस्थितीमध्ये येथील शिक्षकांनी मला दिलेली साथ मी कधीच विसरणार नाही.माझ्या यशाचे सगळे श्रेय येथील शिक्षकांना देते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोमनाथ सपाटे यांनी केले सूत्रसंचालन सुनील जवंजाळ यांनी केले तर उपस्थितांचे आभार महालिंग पाटील यांनी मांडले.