महाराष्ट्र

सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलमध्ये इंग्लिश डे व जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा.

सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलमध्ये बुधवार दि.23/4/2025 रोजी इंग्लिश डे व जागतिक पुस्तक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील सहशिक्षक श्री. नागेश भोसले सर व प्रा.आश्विनी जालगिरे उपस्थित होत्या.तसेच व्यासपीठावर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती शिल्पा ढाळे, सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कु. शुभांगी पवार, इंग्लिश मेडिअमच्या पर्यवेक्षिका कु. सुकेशनी नागटिळक उपस्थित होत्या. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते विलियम्स शेक्सपियर यांच्या प्रतिमेची पूजन करण्यात आले.

यावेळी श्री. नागेश भोसले सर यांनी आपल्या मनोगतातून वाचनाचे महत्त्व सांगितले तसेच पुस्तकांशी मैत्री करा असा संदेश दिला याबरोबरच डॉ. सुधा मूर्ती व नारायण मूर्ती यांचे शैक्षणिक, साहित्यिक योगदान सांगत विद्यार्थ्यांनी महापुरुषांची पुस्तके वाचावीत असे सांगितले. या निमित्ताने बोलताना प्रा. आश्विनी जालगिरे यांनी टी.व्ही मोबाईल यांच्या ऐवजी पुस्तके वाचा. तसेच शाळेने उपलब्ध करून दिलेल्या संधीचे सोने करा हे सांगताना विद्यालयात राबविण्यात आलेल्या उपक्रमाबद्दल कौतुक केले.

यावेळी विद्यालयाच्या सहशिक्षिका कु. सविता गोडसे यांनी इंग्रजी लेखक व त्यांच्या साहित्याबद्दल माहिती दिली. कु. शुभांगी घार्गे यांनी शेक्सपियरची नाटके व लेखनशैली याबद्दल सविस्तर माहिती दिली. कु. पल्लवी थोरात यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. कु. सुरेखा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना वाचन प्रतिज्ञा दिली. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती शिल्पा ढाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. लता देवळे यांनी केले तर कु. मिनाक्षी बिराजदार यांनी शेवटी सर्वांचे आभार मानले.

———————————————–
जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून विद्यालयात बुक क्लबच्या माध्यमातून पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रा. आश्विनी जालगिरे व श्री. नागेश भोसले सर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना वेगवेगळे साहित्यप्रकार माहिती व्हावेत यासाठी कथा, कादंबरी, कवितासंग्रह, महापुरूषांची चरित्रे, आत्मचरित्रे इ. साहित्यप्रकार मांडण्यात आले होते.विद्यालयाच्या सहशिक्षिका कु. पल्लवी थोरात यांनी बुक क्लबची संकल्पना सांगून विद्यार्थ्यांना पुस्तक वाचनासाठी प्रेरीत केले.या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने हे पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमाचे प्रमुख पाहुण्यांनी कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button