सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालय शैक्षणिक वर्ष 2024 25 मधील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न झाला सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक शिवाजी बंडगर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शाळेविषयी ऋण व्यक्त करत शाळेचा निरोप घ्यावा लागत असल्याने खंत ही व्यक्त केली. प्रमुख पाहुणे श्री शिवाजी बंडगर गुरुजी यांनी विविध कथा व कवितांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले तसेच सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली व संस्थेच्या व शाळेच्या प्रगतीबद्दल कौतुक केले. सहशिक्षक नानासाहेब घाडगे व मुख्याध्यापिका शुभांगी पवार यांनी शुभेच्छापर मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना अल्पोपहर देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मल्लप्पा आजुर मॅडम यांनी केले. पाहुण्यांची ओळख अविनाश दिघे सर यांनी करून दिली तर आभार आश्विनी जाधव मॅडम यांनी मानले सदर कार्यक्रमासाठी चौथीचे सर्व वर्गशिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.