जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंगोले वस्ती (सांगोला) शाळेचा इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंगोले वस्ती या शाळेतील सन 2024 25 या वर्षातील वार्षिक परीक्षा संपन्न झाली. दिनांक 26 एप्रिल रोजी इयत्ता चौथीचे विद्यार्थ्यांचा चौथीचा समारंभ, इयत्ता पहिलीतील नवागातांचे स्वागत व विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत अशी कार्यक्रमाची रूपरेखा होती.
सदर कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले प्रतिमापूजनाने झाली. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यानंतर इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांचे नवागातांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. यावेळी इयत्ता पहिलीतील नवीन विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य गुलाब पुष्प देण्यात आले
यावेळी इयत्ता पहिलीतील नवागातांचा चेहऱ्यावर आनंद दिसत होता. 2024 -25 या शैक्षणिक वर्षात विविध स्पर्धा परीक्षा मध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना शाळेतर्फे ‘श्यामची आई’ हे पुस्तक देण्यात आले. या कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग इयत्ता चौथीच्या मुलांचा निरोप समारंभ. यावेळी या विद्यार्थ्यांना पुष्पवृष्टी करत मंडपात आणण्यात आले. या विद्यार्थ्यांनाही शाळेतर्फे इयत्ता पाचवी साठी उपयुक्त पडणारे शुद्धलेखन पुस्तक व इंग्रजी डिक्शनरी देण्यात आली. इयत्ता चौथीचे वर्गशिक्षक श्री औताडे सर यांनी इयत्ता चौथीतील प्रत्येक विद्यार्थ्याबद्दल असणारी आत्मीयता व्यक्त केली.
निरोप मूर्तीनी शाळेबद्दल व वर्गशिक्षक यांच्या बद्दल आपले मनोगत व्यक्त केले. सदर मनोगत व्यक्त करत असताना विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना आपले अश्रू रोखता आले नाहीत.शाळेतील विद्यार्थी शौर्यन चंदनशिवे व अजय कोरे या दोघांनी ईस्ट और वेस्ट, इंगोले वस्ती शाळा बेस्ट. ही कविता सादर करून उपस्थितांची मन जिंकली. इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांनी कृतज्ञता भेट म्हणून शाळेला 3 चप्पल स्टॅन्ड दिले.
सदर कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष म्हणून कडलास केंद्राचे केंद्रप्रमुख हमजूकाका मुलाणी,कडलास केंद्रातील व इतर केंद्रातील शिक्षक, शालेय परिसरातील पालक वर्ग उपस्थित होता. सदर कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले संतोष निंबाळकर सर व पांडुरंग ताटे सर यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन केले. पालक प्रतिनिधी पैकी श्री उत्कर्ष चंदनशिवे यांनी शाळेबद्दल शिक्षकाबद्दल असणारी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.इंगोले वस्ती शाळेतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मोफत मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक श्री विजय घाडगे सर यांचा पालकांमार्फत मायेची शाल देऊन सत्कार करण्यात आला. शाळेतील शिक्षक श्री औताडे सर, निकम मॅडम व लोखंडे मॅडम यांचाही मायेची शाल व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला व कार्यक्रमाची सांगता झाली.



