महाराष्ट्र

सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजचे एच.एस.सी.बोर्ड परीक्षेत उत्तुंग यश*

सांगोला (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,पुणे बोर्डाकडून फेब्रु/मार्च,२०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इ.१२ वी परीक्षेचा निकाल काल सोमवार दि.५ मे २०२५ रोजी आँनलाईन जाहीर झाला.सदर परीक्षेत सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज मधील इ.१२ वी शास्त्र, वाणिज्य व कला शाखेतील विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केले. यामध्ये ज्युनिअर कॉलेज कला शाखा ९४.७४%, वाणिज्य शाखा ९८.९९ % तर शास्त्र शाखेचा निकाल ९९.१२% व ज्युनिअर कॉलेजचा एकूण निकाल ९८.३६ % लागला आहे.

     यामध्ये कला शाखा सृष्टी सुनील लिगाडे ९०.१७% प्रथम क्रमांक, आशा अनिल बुरांडे, सुजित अनिल शिवशरण ८८.३३% द्वितीय क्रमांक, सानिका राजेंद्र जरे ८२.०० तृतीय क्रमांक,वाणिज्य शाखा गुरूदेव अरूण बनकर ९२.८३% प्रथम क्रमांक, मृणाल दिनेश दबडे ९२.५०% द्वितीय क्रमांक, सुहास संतोष नलवडे ९१.८३% तृतीय क्रमांक , शास्त्र शाखा गौरी रमेश वाघमारे ८९.३३% प्रथम क्रमांक, मानसी मधुकर सुरवसे ८९.००% द्वितीय क्रमांक तर प्रतिक्षा संजयकुमार गौंड ८७.६७ % गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळविला.  

          वरील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके,सचिव म. शं. घोंगडे, खजिनदार शंकरराव सावंत,सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, संस्था कार्यकारिणी सदस्य विश्वेश झपके,सर्व संस्था सदस्य, प्राचार्य अमोल गायकवाड, उपमुख्याध्यापिका शहिदा सय्यद , उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे , पर्यवेक्षक सुरेश मस्तुद, प्रदीप धुकटे,मच्छिंद्र इंगोले शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले..

 

 *चौकट* – सदर निकाल जाहीर झाल्यानंतर सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संस्थेचे अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके व सचिव म.शं घोंगडे यांचे शुभहस्ते व प्राचार्य अमोल गायकवाड, उपमुख्याध्यापिका शहिदा सय्यद, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे,पर्यवेक्षक सुरेश मस्तुद, प्रदीप धुकटे, मच्छिंद्र इंगोले व ज्युनिअर कॉलेजमधील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या उपस्थितीत वरील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना अभिनंदन पत्र देऊन त्यांचा पालकांसमवेत सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांनी विद्यार्थी हेच शिल्पकार आहेत असे सांगत स्थापनेपासून विद्यामंदिरची गुणवत्ता कायम राखत यावर्षी मिळविलेल्या उत्तुंग यशाबद्दल विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक व पालकांचे अभिनंदन केले.व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या सत्काराबद्दल पालक व विद्यार्थ्यांनी संस्था, शाळा व शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button