महाराष्ट्र

बारावीच्या परीक्षेत हिंदी विषयात नाझरा विद्या मंदिर ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी बोर्डात प्रथम

 बारावीच्या बोर्ड परीक्षेत नाझरा विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजची कला शाखेची विद्यार्थिनी कुमारी चव्हाण ऋतुजा संतोष हिने हिंदी विषयात 100 पैकी 98 गुण मिळवत बोर्डात प्रथम क्रमांक पटकवण्याचा बहुमान तिने मिळवला.

नाझरा विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजचा कला शाखेचा निकाल ९१.३० टक्के लागला असून वाणिज्य शाखेचा निकाल ९५.२४ टक्के लागला आहे.कला शाखेमध्ये कुमारी ऋतुजा संतोष चव्हाण येणे 600 पैकी 497 (82.83%) गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला,कुमारी मिसाळ प्रांजली बाळकृष्ण हिने 492 (82.00%) गुण मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला तर बनसोडे हेमा भाऊसाहेब हिने 412 (68.67%) गुण मिळवत प्रशालेत तृतीय क्रमांक पटकावला. वाणिज्य शाखेमधून कुमारी जावीर प्रियांका भारत हिने 600 पैकी 478 (78.00%) गुण मिळवत प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक कुमारी व्हनमाने आरती तानाजी 476 (79.33%) गुण व तृतीय क्रमांक बदडे तृप्ती माणिक 468(78.00%) गुण मिळवत यश संपादन केले आहे.

पहिल्यांदाच ग्रामीण भागातून पुणे बोर्डात हिंदी विषयात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या ऋतुजा चव्हाण व तिला हिंदी विषयासाठी मार्गदर्शन करणाऱे प्रा. महेश विभुते यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यशस्वी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांसमवेत प्राचार्य बिभीषण माने व सर्व अध्यापकांच्या उपस्थितीत गुणी विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले.

सदर विद्यार्थ्यांना प्रा. महेश विभुते, प्रा. नारायण पाटील, प्रा. युवराज लोहार प्रा. मोहन भोसले, प्रा. रत्नप्रभा जुंधळे यांनी सदर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, संस्था कार्यकारणी सदस्य विश्वेश झपके, प्राचार्य बिभीषण माने,पर्यवेक्षक मधुकर धायगुडे, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button