महाराष्ट्र

SSC परीक्षेत सांगोला विद्यामंदिरचे 90% पेक्षा अधिक 92 विद्यार्थी

सांगोला (वार्ताहर) एस एस सी बोर्ड परीक्षा 2025 मध्ये 95 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या 41 विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभामध्ये मार्गदर्शन करताना परिश्रम, चिकाटी व सातत्य हीच यशाची गुरुकिल्ली असून विविध कसोट्यांवर मात करत यशाची चव चाखणा-या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना संस्थाध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके सर यांनी वरील गौरव उद्गार काढले.

कुमारी तनुजा चोपडे हिने 99.20 टक्के गुण मिळवत प्रशालेत प्रथम क्रमांक तर समृद्धी भोसले हिने 99 टक्के गुण व कुमारी ओजस्वी नवले हिने 98.80 टक्के गुण मिळवत अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक संपादन केला आहे.

इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील एकूण 508 प्रविष्ट विद्यार्थ्यांपैकी 500 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून प्रशालेचा शेकडा निकाल 98.42 टक्के इतका लागला आहे.

 यामध्ये विशेष श्रेणीत 244, प्रथम श्रेणीत 153, द्वितीय श्रेणीत 82 तर उत्तीर्ण श्रेणीत 21 विद्यार्थी समाविष्ट आहेत.

या निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे 95 टक्के पेक्षा अधिक गुण मिळवणारे 41 तर 90 टक्के पेक्षा अधिक गुण मिळवणारे 92 विद्यार्थी आहेत.

मराठी विषयात 100 पैकी 98 गुण मिळवणारा एक, संस्कृत विषयात 100 पैकी 100 गुण मिळवणारे चार, हिंदी विषयात 100 पैकी 95 गुण मिळवणारे दोन, इंग्रजीत 100 पैकी 99 गुण मिळविणारा एक, गणित विषयात 100 पैकी 100 गुण मिळवणारे अकरा, विज्ञान व तंत्रज्ञान या विषयात 100 गुण मिळवणारा एक, समाजशास्त्रात 100 पैकी 98 गुण मिळवणारे तीन तसेच टेक्निकल मध्ये 100 पैकी 92 गुण मिळवणारा एक विद्यार्थी असे दैदीप्यमान यश मिळवणारी सांगोला विद्यामंदिर प्रशाला ही तालुक्यातील अग्रगण्य शाळा ठरली आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्था सचिव मल्लिकार्जुन घोंगडे सर, खजिनदार शंकरराव सावंत सर, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके साहेब कार्यकारणी सदस्य विश्वेशजी झपके साहेब यांच्यासह सर्व संस्था सदस्यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रशालेचे प्राचार्य अमोल गायकवाड सर यांनी तर आभार पर्यवेक्षक सुरेश मस्तुद सर यांनी मानले.

यावेळी उपमुख्याध्यापक सौ.शाहिदा सय्यद, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, पर्यवेक्षक मच्छिंद्र इंगोले, प्रदीप धुकटे उपस्थित होते.सूत्रसंचालन प्रशांत रायचुरे सर यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button