उत्कर्ष विद्यालय- एक संस्कारपीठ; प्रा.निलिमा कुलकर्णी यांचे प्रतिपादन..

माता- बालक प्रतिष्ठान संचलित उत्कर्ष विद्यालयातील इयत्ता दहावितील विद्यार्थ्यानी सलग आठव्या वर्षी एस.एस.सी.बोर्ड परिक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा राखली आहे..त्याच प्रमाणे बारावी बोर्ड परिक्षेत देखिल सलग दुसर्या वर्षी देखिल शंभर टक्के निकाल लावून सलग दुसर्या वर्षी जवळे केन्द्रात प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला आहे…त्यामूळे उत्कर्ष विद्यालय हे केवळ ज्ञानपीठ न राहता एक आदर्श संस्कारपीठ बनले आहे,असे कौतुकोद्गार संस्था अध्यक्षा प्रा.निलिमा कुलकर्णी यानी काढले…उत्कर्ष माध्यमिक विद्यालयातील एस.एस.सी.गुणवंत विद्यार्थी-पालक गौरव सोहळ्यात त्या बोलत होत्या…यावेळी व्यासपीठावर संस्थापक अध्यक्षा डॉ.संजीवनी केळकर,कोषाध्यक्षा डॉ.शालिनी कुलकर्णी,प्राचार्य सुनील कुलकर्णी,मार्गदर्शक प्रा.राजेंद्र ठोंबरे उपस्थित होते…सांगोला शहरातील केळकर हॉस्पिटल मधिल व्यंकटेश सभागृहात सदर सोहळा संपन्न झाला..
मन,मनगट व मेंदू बळकट करण्याच्या दृष्टीने माता- बालक प्रतिष्ठान कार्य करत असुन दर्जेदार शिक्षण देण्याचा संस्थेचा प्रयत्न असेल,असे डॉ.संजीवनी केळकर यानी सांगून विद्यार्थ्याना शुभेच्छा दिल्या…प्राचार्य सुनील कुलकर्णी यानी विद्याल्याच्या गुणात्मक व संख्यात्मक प्रगतीचा आढावा घेवून इयत्ता बारावी साठी विद्यालय राबवित असलेल्या उपक्रमाची माहिती दिली…गुणवंत विद्यार्थी हे देशाचे धन असुन अशा विद्यार्थ्यानी मुलभूत संशोधनाकडे वळावे,आशी अपेक्षा प्रा.राजेंद्र ठोंबरे यानी व्यक्त केली…या कार्यक्रमात गुणानुक्रमे पहिल्या पाच विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला..
या मध्ये वैष्णवी विजय राऊत,शर्वरी रामदास जाधव,सिद्धी शिवदास दिवटे,आर्या राजकुमार गावडे,विश्वास आलनदीप टापरे,संस्कृती चंद्रकांत सावंत,रेणुका सोमनाथ दिवटे या गुणवंत विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना भेटवस्तू व गुलाबाची रोपे देवुन सन्मानित करण्यात आले..विद्यार्थी व पालकांनी मनोगत व्यक्त करताना विद्यालय,संस्था व शिक्षकांविषयी ऋण व्यक्त केले…विद्याल्यातील सर्व शिक्षकांचा व सेवकांचा सत्कार करण्यात आला…मार्गदर्शक शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले..कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक मुक्तानंद मिसाळ,सूत्रसंचालन संचित राऊत व आभार प्रदर्शन दत्तात्रय सावंत या शिक्षकांनी केले..या वेळी प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विश्रांती मागाडे,बालक मंदिर मुख्याध्यापिका संध्या शास्त्री,प्रा.शुभान्गी कवठेकर आदि उपस्थित होते…



