सांगोला:-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांडेकर वस्ती नंबर २ (गायगव्हाण )केंद्र_ महूद या शाळेतील इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी सिद्धी विठ्ठल खांडेकर हिने राज्यस्तरीय एटीएस प्रज्ञाशोध स्पर्धा परीक्षेमध्ये २०० पैकी १७४ गुण मिळवून महूद केंद्रात पहिला, जिल्ह्यात पाचवा तर राज्यात बारावा क्रमांक मिळवून यश संपादन केले. तिला वर्ग शिक्षिका सौ. मनीषा धनंजय खबाले व तिचे पालक श्री विठ्ठल खांडेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
तिच्या या यशाबद्दल मुख्याध्यापिका श्रीमती गेंड मॅडम, एसएमसी अध्यक्ष श्री. रामेश्वर झोळ, उपाध्यक्ष श्री. राजू देवकते तसेच केंद्रप्रमुख श्री दिलीप ढेरे, विस्तार अधिकारी श्री. लहू कांबळे, गटशिक्षणाधिकारी श्री. सुयोग नवले यांनी तिचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धा परीक्षांसाठी शुभेच्छा दिल्या.