भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना Combined Defence Service (CDS) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेणेसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी दिनांक 16 जून 2025 ते 29 ऑगस्ट 2025 या कालावधीत CDS कोर्स क्र. 65 आयोजित करण्यात येत आहे. कोर्स कालावधीत प्रशिक्षणार्थीना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाते.
तरी सोलापूर जिल्हयातील इच्छुक उमेद्वारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर येथे दिनांक 12 जून 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी Department of Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या वेबसाईट वर सर्च करुन त्यामधील CDS-65 कोर्ससाठी प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरुन सोबत घेऊन यावे.
सदर सी.डी.एस. वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी खालील नमुद पात्रता असणे आवश्यक आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येतांना सोबत घेऊन यावेत :- उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. उमेदवार संघ लोकसेवा आयोग (UPSC) नवी दिल्ली यांचे मार्फत घेण्यात येणा-या सी.डी.एस. (CDS) या परिक्षेकरिता ऑनलाईन व्दारे अर्ज केलेला असावा.
अधिक माहीतीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आयडी : training.pctcnashik@gmail.com व दुरध्वनी क्र. 0253-2451032 किंवा व्हाटसअप क्रं. 9156073306 (प्रवेशपत्र मिळविण्यासाठी) असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दुरध्वनीवर संपर्क करावा असे आवाहन, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मिलिंद तुंगार यांनी केले आहे.
Back to top button