बंडोपंत येडगे सर यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ..

रविवार दिनांक 1 जून रोजी बंडोपंत येडगे सर यांच्या सेवापूर्ती समारंभाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह सांगोला येथे दुपारी बारा वाजता आयोजन केले असल्याचे डॉक्टर चंद्रकांत येडगे व युवा नेते सुशांत येडगे यांनी सांगितले.
दि. 31 मे रोजी 32 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर श्रीधर कन्या प्रशाला व ज्युनिअर कॉलेज नाझरे या शाळेतून येडगे सर सेवानिवृत्त होत आहेत व त्याबद्दल सत्कार समारंभाचे आयोजन केले असून, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख, जिल्हा परिषद सदस्य सुभाष माने, सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष प्रा.पी.सी. झपके, ग्रामीण साहित्यिक प्रा. माणिकराव पाटील हे उपस्थित राहणार आहेत. तसेच उद्योगपती बाळासाहेब एरंडे, एडवोकेट जालिंदर ढेरे, माजी नगराध्यक्ष मारुती आबा बनकर, डॉक्टर निकिताताई देशमुख, माजी उपसभापती सुनील चौगुले, माजी प्राचार्य प्रकाश परिचारक हे उपस्थित राहणार आहेत तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे आव्हान संयोजकांनी केले आहे.



