सांगोला तालुका कविसंमेलनामध्ये तीस कवी,कवयित्रींचा सन्मान

सांगोला ( प्रतिनिधी) माणदेशात अनेक दर्जेदार साहित्याची परंपरा आहे. कथा, कविता, कादंबरी, ललित लेखन अशा विविध साहित्य प्रकारात माणदेशातील साहित्यिक आपला वेगळा ठसा उमटवत आहेत. यानुसार कवी,कवयित्री यांचे सादरीकरण,नवोदितांना प्रोत्साहन व कवी,कवयित्री यांचा सन्मान या हेतूने महाराष्ट्र साहित्य परिषद, नगर वाचन मंदिर,लायन्स क्लब, रोटरी क्लब व अर्बन बँक सांगोला यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित अर्बन बँक सांगोला येथील सभागृहामध्ये संपन्न झालेल्या सांगोला तालुका कवी संमेलनामध्ये तीस कवी कवयित्रींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष रं.ता.चोरमुले,प्रमुख पाहुणे डॉ.अविनाश सांगोलेकर,म.सा.प.,नगर वाचन मंदिरचे अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, संस्थापक चेअरमन डॉ. प्रभाकर माळी,म.सा.प. कार्याध्यक्ष,ज्येष्ठ साहित्यिक डॉ.कृष्णा इंगोले, लायन्स क्लबचे अध्यक्ष उन्मेष आटपाडीकर, रोटरी क्लबचे अध्यक्ष विकास देशपांडे,म.सा.प. प्रमुख कार्यवाह व सांगोला तालुका कविसंमेलन समन्वयक प्रा.धनाजी चव्हाण उपस्थित होते.
या कविसंमेलनामध्ये शिवाजी बंडगर, राधिका प्रेमसंस्कार,तानाजी वाघमारे,साबळे गुरुजी,ना.मा.कांबळे,ॲड उदय दौंडे, निलिमा कुलकर्णी,पुष्पलता मिसाळ, सुशिला नांगरे-पाटील,योजना मोहिते,मनीषा ठोंबरे,हर्षदा गुळमिरे,सुवर्णा तेली,गौसपाक मुलाणी,गीता गुळमिरे,आश्लेषा मोदी,सुप्रिया कांबळे, जान्हवी सावंत,
सीमा गायकवाड,सुरेखा कुलकर्णी,जयश्री पाटील,प्रज्ञा देशपांडे,विदया शिर्के,बशीर तांबोळी,वंदना पाटणे, श्रद्धा गुळमिरे,श्वेता कारंडे,संगिता केसकर व खुमारदार शैलीत कवी सुनील जवंजाळ यांनी कविसंमेलनाचे सूत्रसंचालन केले.मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
तसेच या कवी संमेलनामध्ये ज्येष्ठ साहित्यिक कृष्णा इंगोले व कवी आनंद लोकरे यांनी कविता सादरीकरण केले.
यावेळी कवी संमेलनामध्ये डॉ. प्रभाकर माळी, प्रा.प्रबुद्धचंद्र झपके,डॉ.अविनाश सांगोलेकर,रं.ता.चोरमुले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
‘पंढरीचा परिवार’ यूट्यूब चॅनलचे संतोष कसगावडे व श्री.क्रिएशनचे श्रीकांत बंडगर यांचा सन्मान करण्यात आला.
या कवी संमेलनासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद, नगर वाचन मंदिर, लायन्स क्लब ,रोटरी क्लब,अर्बन बँक सांगोला पदाधिकारी, सदस्य, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वागत कविसंमेलन समन्वयक प्रा.धनाजी चव्हाण यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी सुनील जवंजाळ यांनी केले तर लायन्स क्लबचे अध्यक्ष उन्मेष आटपाडीकर यांनी आभार प्रदर्शन केले.



