महाराष्ट्र

रोटरी क्लब व इनरव्हील क्लब सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने 15 ऑगस्ट रोजी देशभक्तीपर गीतांवर समूहनृत्य स्पर्धेचे आयोजन

यावर्षीपासून पहिली ते चौथी जिल्हा परिषद शाळांचा व खाजगी शाळांचा करण्यात येणार स्वतंत्र गट

सांगोला(प्रतिनिधी):सांगोला शहर व तालुक्यातील प्राथमिक, सर्व खाजगी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी सालाबाद प्रमाणे याही वर्षी सांगोला रोटरी क्लब व सांगोला इनरव्हील क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने देशभक्तीपर गीतांवर समोर नृत्य स्पर्धेचे आयोजन शुक्रवार दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 1 वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह सांगोला येथे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती रोटरी क्लबचे अध्यक्ष श्रीपती आदलिंगे व इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा डॉ.सुजाता पाटील यांनी दिली.यावर्षीपासून पहिली ते चौथी जिल्हा परिषद शाळांचा व खाजगी शाळांचा स्वतंत्र गट करण्यात येणार आहे.

इयत्ता पहिली ते चौथी गटातील प्रथम क्रमांक विजेत्यास 3500 रुपये व ट्रॉफी, द्वितीय क्रमांक विजेत्यास 3000 रुपये व ट्रॉफी तर तृतीय क्रमांक विजेत्यास 2500 रुपये व ट्रॉफी देण्यात येणार आहे.

इयत्ता पाचवी ते सातवी गटातील प्रथम क्रमांक विजेत्यास 4500 रुपये व ट्रॉफी, द्वितीय क्रमांक विजेत्यास 4000 रुपये व ट्रॉफी तर तृतीय क्रमांक विजेत्यास 3500 रुपये व ट्रॉफी देण्यात येणार आहे.

इयत्ता आठवी ते दहावी गटातील प्रथम क्रमांक विजेत्यास 5500 रुपये व ट्रॉफी, द्वितीय क्रमांक विजेत्यास 5000 रुपये व ट्रॉफी तर तृतीय क्रमांक विजेत्यास 4500 रुपये व ट्रॉफी देण्यात येणार आहे.

स्पर्धेचे नियम व अटीःप्रत्येक गटात प्रथम नाव नोंदविणार्‍या 15 संघास प्रवेश दिला जाईल. 2) प्रत्येक गटात, प्रत्येक शाळेला एकच संघ पाठविता येईल.3) समूह नृत्यामध्ये विद्यार्थी संख्या 7 ते 15 असावी. 4) समूह नृत्य हे देशभक्ति गितावर आधारीत असावे. रिमिक्स असू नये. मूळगीताच्या चालीवर असावे. 5) अनेक गीताचे मुखडे एकत्र करून तयार केलेले गीत मूळ चालीचे (original) चालेल. 6) गीत 5 ते 7 मिनीटाचे असावे. 7) Pendrive मध्ये एकच गीत असावे. 8) प्रत्यक्ष वाद्यवृंद आणू नये. 9) मूळ संगीतात बदल व अश्लिल गीत स्वीकारली जाणार नाही. 10) परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील. 11) स्पर्धेसंबंधी कोणाची कोणत्याही प्रकारची हरकत अथवा तक्रार स्वीकारली जाणार नाही . 12) स्पर्धा सुरु असताना अथवा संपल्यानंतर कोणत्याही संघाने अथवा शाळेने गोंधळ अथवा हुल्लडबाजी केलेचे निदर्शनास आल्यास संबंधित संघास अथवा शाळेस पुढील तीन वर्षासाठी सहभागी करून घेतले जाणार नाही. 13) नोंदणी दि. 13 ऑगस्ट 2025 रोजी सायं. 5 वाजेपर्यंत राहील.

स्पर्धेच्या अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी रो. डॉ.साजिकराव पाटील मो.8888883663, रो. इंजि.अशोक गोडसे मो. 9423327346, रो इंजि.विकास देशपांडे मो.9422644644, रो.विजय म्हेत्रे मो.9822142446, रो.निसार इनामदार मो.9689555056, रो.धनाजी शिर्के मो.9960125002, डॉ.सुजाता पाटील मो.7588216331, सौ.संगीता चौगुले मो.9423327502 यांच्याशी संपर्क साधावा.
देशभक्तीपर गीतांवर समुह नृत्य स्पर्धेमध्ये सांगोला तालुक्यातील जास्तीत जास्त प्राथमिक व माध्यमिक शाळांनी सहभागी व्हावे असे आवाहन रोटरी क्लबचे सचिव रो. विजय म्हेत्रे व इनरव्हील क्लबच्या सचिव सौ. संगीता चौगुले यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button