नाझरा विद्यामंदिर प्रशालेचे 17 विद्यार्थी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत; राष्ट्रीय ग्रामीण मधून राज्याच्या शिष्यवृत्ती यादीत दोन चमकले*
नाझरा(वार्ताहार):- विद्या परिषद पुणे यांच्यावतीने फेब्रुवारी 2023 मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत नाझरा विद्यामंदिर प्रशालेतील इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत यशाची परंपरा कायम राखली आहे.
पाचवीचे पाच विद्यार्थी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत चमकले आहेत तर प्रणव प्रकाश शेळके याने 270 गुण मिळवून राष्ट्रीय ग्रामीण मधून राज्यात सातवा क्रमांक पटकावला आहे. त्याचबरोबर इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत दहा विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत स्थान पटकावले असून संस्कार संतोष गोडसे 254 गुण मिळवून राष्ट्रीय ग्रामीण विभागातून राज्याच्या गुणवत्ता यादीत सातव्या क्रमांकावर स्थान पटकावले आहे.
इयत्ता पाचवी चे जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत स्थान पटकावलेले विद्यार्थी पुढील प्रमाणे कार्तिक संभाजी शितोळे 248 गुण जिल्ह्यात 49 वा,वेदांत अतुल बनसोडे 236 गुण जिल्ह्यात 147 वा,ओम गोपालकृष्ण दिक्षित 234 गुण जिल्ह्यात 186 वा, ओम मल्हारी बनसोडे 226 गुण जिल्ह्यात 289 वा, दीप्ती जालिंदर मिसाळ 220 गुण जिल्ह्यात 365 वी, सदर विद्यार्थ्यांना पाचवी शिष्यवृत्ती विभाग प्रमुख सुनील जवंजाळ, मारुती सरगर,महालिंग पाटील व दीप्ती काशीद यांचे मार्गदर्शन लाभले
.इयत्ता आठवी तील जिल्हास्तरीय यादीतील गुणवंत विद्यार्थी पुढील प्रमाणे सोहम संजयकुमार सासणे गुण 242 जिल्ह्यात सातवा,ओम आदिनाथ गुरव गुण 236 जिल्ह्यात 19 वा, विनायक धनाजी पांढरे गुण 222 जिल्ह्यात 57 वा,स्नेहल सुभाष बाबर गुण 214 जिल्ह्यात 92 वी, तेजल यशवंत गडदे गुण 210 जिल्ह्यात 108 वा,रोशनी चंद्रकांत विटेकर गुण 206 जिल्ह्यात 128 वी, ओम सुनील खंडागळे गुण 206 जिल्ह्यात 128 वा, सोहन प्रशांत आदट गुण 190 जिल्ह्यात 251वा, वैष्णवी शहाजी बाबर गुण 190 जिल्ह्यात २५८ वी, चेतन शरद यादव गुण 186 कुणबी प्रवर्गातून जिल्ह्यात प्रथम.इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती विभाग प्रमुख वसंत गोडसे,दिलीप सरगर,मारुती सरगर व संभाजी सरगर यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रबुद्धचंद्र झपके, संस्था सचिव मल्लिकार्जुन घोंगडे,संस्था सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके,संस्था कार्यकारणी सदस्य विश्वेश झपके,प्राचार्य अमोल गायकवाड,पर्यवेक्षक मधुकर धायगुडे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.



