महाराष्ट्र

सांगोल्याच्या लेकीचे शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यश

सांगोल्यातील कु. श्रावणी चंद्रशेखर देशपांडे हिने कर्नाटक मधील शृंगेरी येथील केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय, राजीव गांधी परिसर या विद्यापीठातून संस्कृत विषयात शिक्षाशास्त्री (बी.एड.) पदवी परीक्षेत ८९ टक्के गुण मिळवून विशेष प्राविण्यासह यश प्राप्त केले. यापूर्वी तिने तिरुपती येथील शिक्षाशास्त्री राष्ट्रीय संस्कृत विश्वविद्यालयातून संस्कृत व्याकरणशास्त्रामधे आचार्य (एम.ए.) ही पदवी संपादन केली. तसेच प्राकशास्त्री(११वी -१२ वी) मध्ये तिला सुवर्ण पदक मिळाले होते.

याशिवाय तिने काशी येथील अखिलभारतीयशास्त्रीयस्पर्धा (मार्च २०२३) या वर्षी आयुर्वेदशास्त्रावर झालेल्या भाषणस्पर्धेत राष्ट्रीय स्तरावरील कांस्यपदक मिळवले होते. तिचे शालेय शिक्षण सांगोला विद्यामंदिर प्रशाला सांगोला येथे झाले. संस्कृतची आवड असल्यामुळे त्यामधील विषयाच्या अभ्यासाला वाहून घेतले. तिच्या या यशाबद्दल शिक्षक,नातेवाईक,ग्रामस्थ, यातून अभिनंदन होत आहे. तसेच श्रावणी तिच्या यशाचे श्रेय तिची आई कै.स्नेहा देशपांडे यांना देते. सांगोला येथील देशपांडे गल्लीत राहणारे वरिष्ठ बँक अधिकारी श्री.चंद्रशेखर देशपांडे यांची सुकन्या आहे.

संस्कृत विषयातील पदव्युत्तर शिक्षण परराज्यात जाऊन घेणारी श्रावणी ही सांगोला तालुक्यातील पहिली विद्यार्थिनी आहे. तिच्या यशाचे श्रेय तिचे पालक, सर्व गुरुजन आणि आप्तजन यांचे आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button