सोनंद हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मधील कुमारी स्वाती भोसले व अर्चना राजगे भूगोल रत्न पुरस्काराने सन्मानित

सोनंद हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज सोनंद मधील विद्यार्थिनी कुमारी भोसले स्वाती शशिकांत व कुमारी राजगे अर्चना यांनी भूगोल विषयात सर्वाधिक गुण मिळवल्याबद्दल त्यांना यावर्षीचा भूगोल रत्न हा सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरविण्यात आले .
सदरचा पुरस्कार पशुवैद्यकीय अधिकारी निता सावर्डेकर मॅडम व माजी सैनिक मेजर ज्ञानेश्वर काशीद यांच्या हस्ते देण्यात आला. गोल्ड मेडल, ट्रॉफी, प्रशस्तीपत्र व रोख बक्षीस असे या पुरस्काराचे स्वरूप होते. सदर पुरस्कार सोनंद हायस्कूलचे भूगोल विषयाचे प्रा. अल्ताफ नदाफ सर यांच्याकडून दरवर्षी दिला जातो.
सदर पुरस्कार देतेवेळी सोनंद गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, प्रतिष्ठित नागरिक, संस्थेचे पदाधिकारी, दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ हजर होते. भूगोल रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थाध्यक्ष मा.आमदार दीपक आबा साळुंखे पाटील, संस्था उपाध्यक्ष हेमंत कुलकर्णी, संस्था सचिव बसवेश्वर म्हमाणे सर, माजी अध्यक्ष सहदेव पाटील सर व इतर संस्था सदस्यांनी कु. स्वाती भोसले व कु. अर्चना राजगे यांना शुभेच्छा दिल्या. या पुरस्कारामुळे सदर विद्यार्थिनीचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.



