सांगोला विद्यामंदिरच्या अकरा विद्यार्थ्यांना इन्स्पायर स्कॉलरशिप

सांगोला ( प्रतिनिधी ) सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संचलित सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजमधील फेब्रुवारी २०२४ इयत्ता १२ वी विज्ञान शाखेतील गुणवंत विद्यार्थी तनुजा ढोले,अदिती गायकवाड,भक्ती घाडगे, अश्विनी हाके,वैभवी इंगोले, अंजली करपे, मोनिका काशीद,इक्राम खतीब, आर्या वेदपाठक, श्रद्धा वेदपाठक व हर्षद वाघमारे या अकरा विद्यार्थ्यांना इन्स्पायर स्कॉलरशिप मिळणार आहे.
बारावी विज्ञानशाखेतील चांगल्या प्रतिभावान विद्यार्थ्यांमधून संशोधक/ शास्त्रज्ञ घडविण्यासाठी,संशोधनाकडे आकर्षित करण्यासाठी केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाद्वारे इन्स्पायर स्कॉलरशिप ( इनोव्हेशन इन सायन्स पर्स्यूएट फॉर इन्स्पायर्ड रिसर्च- INSPIRE) देण्यात येते.
या स्कॉलरशिप अंतर्गत राज्यांच्या बारावी बोर्ड परीक्षेमध्ये पहिले एक टक्के विद्यार्थी ज्यांनी मुलभूत किंवा नैसर्गिक विज्ञान शाखेमध्ये पदवी वा इंटिग्रेडेट एम.एससीला प्रवेश घेतला आहे ते पात्र ठरतात.व स्कॉलरशिप अंतर्गत व साधारणत: १०,००० विद्यार्थ्यांची निवड केली जाते व वार्षिक रु.८०,०००/- ची स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना मिळते.
यामध्ये सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजच्या अकरा विद्यार्थ्यांची निवड झाल्यामुळे यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ, सांगोला अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, खजिनदार शंकरराव सावंत,सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके,संस्था कार्यकारिणी सदस्य विश्वेश झपके, सर्व संस्था सदस्य,प्राचार्य अमोल गायकवाड ,उपप्राचार्य शहिदा सय्यद,शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.