जागतिक सायकल दिनानिमित्तची सायकल वारी बेतली जीवावर; मंगळवेढ्यातील तरुण उद्योजक सुहास ताड यांचा अपघातात मृत्यू

सांगोला(प्रतिनिधी):-जागतिक सायकल दिनानिमित्त मंगळवेढा-पंढरपूर-सांगोला-मंगळवेढा ही केलेली सायकल वारी जीवावर बेतली असून मंगळवेढ्यातील तरुण उद्योजक सुहास ताड (वय 46 )यांचा सांगोला शहरातील जलशुध्दीकरण केंद्राच्या जवळ पहाटेच्या दरम्यान झालेल्या अपघातात आपला जीव गमवावा लागला.अपघाताची फिर्यादी सुधीर ताड (मंगळवेढा) यांनी सांगोला पोलीस स्टेशनला दिली. अपघातानंतर घटनास्थळी बघ्याची एकच गर्दी झाली होती.
जागतिक सायकल दिनाच्या अनुषंगाने काल मंगळवेढा -पंढरपूर-सांगोला- मंगळवेढा हा सायकलवर प्रवास केल्यानंतर जागतिक सायकल दिनानिमित्त सायकलवारी करण्यासंदर्भात रात्री त्यांच्या इतर मित्रांबरोबर व्हाट्सअप चॅटिंग देखील झाले होते मात्र इतर दोन मित्र पहाटे लवकर न उठल्यामुळे सुहास ताड हे एकमेव सायकलवारीसाठी पंढरपूर मार्गे निघाले.सायकलवरून जात असताना सांगोला येथे अज्ञात वाहनाने सुहास ताड यांच्या सायकला जोराची धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तरुण उद्योजक सुहास ताड यांचा अपतातात मृत्यू झाल्याने व्यापारी वर्गात शोककाळ पसरली.