सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूल येथे जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात आणि जोशात साजरा करण्यात आला.यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची रोपे आणून सहभाग नोंदवला. ही रोपे शाळेच्या परिसरात लावून परिसराचे हरितीकरण करण्यात आले आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती शिल्पा ढाळे,पर्यवेक्षिका कु. सुकेशनी नागटिळक,विभाग प्रमुख कु. भाटेकर,कु.पल्लवी थोरात तसेच सर्व शिक्षक, विद्यार्थी,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या विशेष प्रसंगी पालकांनीही सक्रीय सहभाग घेतला. पालकांच्या हस्ते रोपांची लागवड करण्यात आली. या दिनाचे औचित्य साधून विद्यालयात ‘इको क्लब’ ची स्थापना करण्यात आली. इको क्लबसाठी इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत प्रत्येक वर्गातून एका विद्यार्थ्याची निवड करण्यात आली. या क्लबच्या माध्यमातून वर्षभर विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात येणार असून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी आणि समज विकसित केला जाणार आहे.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कु. शिल्पा ढाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.