कमलापूर ग्रामपंचायतचा स्तुत्य उपक्रम – दिव्यांग बांधवांना निधी वाटप

कमलापूर ग्रामपंचायतीच्या वतीने दिव्यांग बांधवांना दिव्यांग निधीचे वितरण करण्यात आले. समाजातील जो वंचित,गरजू ,दुर्लक्षित, शोषित,पीडित दिव्यांग घटक आहेत त्या घटकाला कमलापूर ग्रामपंचायतीने न्याय देण्याचे काम कमलापूर ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आले. यामध्ये 45 लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले.
यावेळी दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद होता. या निधीचे योग्य पद्धतीने नियोजन केल्यास त्यांच्या जीवनामध्ये आमुलाग्र बदल होऊ शकतो. फुल नाय फुलाची पाकळी देऊन ग्रामपंचायत कमलापूर यांनी त्यांचा सन्मान केला. गेल्या पाच वर्षांमध्ये ग्रामपंचायत कमलापूरच्या वतीने अशी विविध उपक्रम हाती घेण्यात आले.
यामध्ये कर्तव्यदक्ष ग्रामसेवक संजय खटकाळे,कमलापूर गावचे सरपंच रावसाहेब अनुसे,उपसरपंच नितीन काळे,शेतकरी कामगार पक्षाचे नेते बाबुराव बंडगर देविदास ढोले,तंटामुक्तीचे उपअध्यक्ष सोमनाथ अण्णा अनुसे,ग्रामपंचायत सदस्य अंकुश(राजू) गोडसे,प्रा.एन.डी.बंडगर,भगवान अनुसे, दिलीप बंडगर, इंजि.सागर अनुसे, राहुल ऐवळे, संजय बंडगर सदर कार्यक्रमांमध्ये सोमनाथ अनुसे व प्रा.एन.डी.बंडगर, यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत कमलापूरचे सर्व सेवक वर्ग यांचे मोठे सहकार्य लाभले.