शिक्षकाच्या हातून अनेक पिढ्या घडत असतात. समोर असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा वेद घेत अध्यापनाचे धडे शिक्षक देत असतात. जेव्हा शिक्षण सेवेत शिक्षक स्वतःला समर्पित करतो तेव्हा खऱ्या अर्थाने अध्ययन-अध्यापन प्रक्रिया प्रभावी होते. राजाराम बनसोडे यांनी आयुष्यभर सेवावृत्ती जोपासली म्हणूनच त्यांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमास ही अलोट गर्दी पाहायला मिळते. सेवावृत्ती हेच शिक्षकाचे खरे वैभव आहे असे प्रतिपादन शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष व छत्रपती परिवार मरवडेचे संस्थापक सुरेश पवार यांनी केले.
सांगोला तालुक्यातील चोपडी केंद्रात असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक राजाराम बनसोडे यांच्या सेवापूर्ती सत्कार समारंभात अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले, सिंहगड इन्स्टिट्यूट कमलापूरचे कॅम्पस डायरेक्टर अशोक नवले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तात्यासाहेब बाबर,केंद्रप्रमुख दिनकर गाडे, काझी गुरुजी उपसरपंच पोपट यादव, चेअरमन भिकाजी बाबर, पंचायत समितीचे माजी उपसभापती सुनील चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.
सिद्धी केंगार, काजल वाघमारे,वेदांत मेखले,अभय खळगे या विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली.
त्यानंतर चोपडी ग्रामस्थांच्या व शाळा व्यवस्थापन समिती गणेश नगर यांच्या वतीने राजाराम बनसोडे गुरुजी व सौ भारती बनसोडे यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
त्यानंतर गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले,शरद यादव, शैलेश पवार, शिवाजी आलदर,पतंगराव बाबर, भारत लवटे,आबा पांढरे,यु.टी.जाधव अशोक नवले, सहदेव विटेकर आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व बनसोडे गुरुजींच्या पुढील आरोग्यमय आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश नगर परिसरातील पालकांनी विशेष प्रयत्न केले सदर कार्यक्रमासाठी सर्व आजी-माजी विद्यार्थी त्यांचे पालक सांगोला तालुक्यातील शिक्षक बांधव माजी मुख्याध्यापक सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षिका व चोपडी परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रूपाली पवार यांनी केले व सूत्रसंचालन सुनील जवंजाळ यांनी केले.