महाराष्ट्र

नूतन पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांचा ग्रामीण पत्रकार संघटनेतर्फे सत्कार संपन्न

छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांनी स्वराज्य निर्माण करताना जात पाहिली नाही व आपण काम करीत असताना मानव हाच एकमेव केंद्रबिंदू मानून काम करीत आलो आहे व आज सांगोला तालुक्याची परिस्थिती पाहता तालुका मोठा आहे व पोलीस स्टाफ कमी आहे व यासाठी सर्वांनी सहकार्य करा असे मत पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी सत्कार प्रसंगी मत व्यक्त केले.

सुरुवातीस संघटनेचे अध्यक्ष रविराज शेटे यांच्या शुभहस्ते व उपाध्यक्ष सचिन धांडोरे, दशरथ बाबर, सहखजिनदार समाधान धांडोरे, सदस्य संतोष बनसोडे यांच्या उपस्थितीत पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस स्टेशनची प्रेस नोट ग्रामीण पत्रकाराला मिळावी असे संघटनेचे अध्यक्ष रविराज शेटे यांनी मागणी केली तर प्रत्येकास प्रेस नोट बातमी याबाबत प्रशासनास पोलीस निरीक्षक घुगे यांनी सूचना दिल्या. यावेळी पोलीस हवालदार अनिल बनसोडे, पोलीस नाईक एस. आर. जाधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button