महाराष्ट्र

सांगोला महाविद्यालयात महाराष्ट्र व कामगार दिन उत्साहात साजरा

येथील सांगोला महाविद्यालयामध्ये महाराष्ट्र व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड व महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांचेहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

01 मे 2025 रोजी आपल्या राज्यात महाराष्ट्र व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सांगोला महाविद्यालयामध्येही महाराष्ट्र व कामगार दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड, उपाध्यक्ष प्रा.पी.सी. झपकेसर, सहसचिव साहेबराव ढेकळे, संस्थेचे सदस्य म.सि.झिरपे, श्री. सु. ग. फुले, सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. कृष्णा इंगोले, प्राध्यापक डॉ. व्ही. व्ही. जाधव, डॉ. बी.एच.कुलकर्णी, प्रा. बी. के. लोंढे, प्रा. एस. व्ही. साळुंखे, श्री. एन.एस.सुरवसे, श्री. मधुकर कसबे, श्री. अशोक खडतरे, तसेच श्री.अच्युत फुले, यांचेसह संस्थापदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रा.डॉ.विजयकुमार गाडेकर यांनी सूत्रसंचालन केले, प्रा.संतोष कांबळे यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button