महाराष्ट्र

रोटरी क्लब सांगोला तर्फे जागतिक रक्तदाता दिन व रक्तदान शिबिर संपन्न…

सांगोला रोटरी क्लब यांच्या वतीने व सांगोल्यातील अग्रगण्य अशा रेवनील ब्लड बँक यांच्या सहकार्याने जागतिक रक्तदाता दिन हा रक्तदात्यांचा सत्कार व रक्तदान करून साजरा करण्यात आला.

सांगोला रोटरी क्लब नेहमीच विविध सामाजिक क्षेत्रांमध्ये कार्यरत असते याचाच एक भाग म्हणून व रक्तदानाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यावर आला. यामध्ये प्रातिनिधिक स्वरूपात रक्तदान करण्यात आले. यावेळी जे रक्तदाते केव्हाही गरज आहे त्यावेळी येऊन रक्तदान करून लोकांना मदत करतात अशा ५ व्यक्तीचा सन्मान रोटरीतर्फे करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये संजय वाघमारे,असिफ काझी,शितल पवार, स्वप्निल जंगळे व बाळासाहेब तंडे यांनी रक्तदान केले. याप्रसंगी रोटरी क्लबने त्यांचा सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आला.

याप्रसंगी रेवनील ब्लड बँकेचे प्रमुख सोमेश यावलकर व श्रीकांत पाटील यांनी या कार्यक्रमास सहकार्य केल्याबद्दल रोटरी तर्फे त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब चे अध्यक्ष रो. विकास देशपांडे व सचिव रो.विलास बिले यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button