सांगोला महाविदयालयात योग दिवस साजरा

अकरावा आंतरराष्ट्रीय योगा दिवस सांगोला महाविद्यालयांमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांनी सुरुवातीस योगासन, प्राणायाम सध्याच्या धक्काधक्कीच्या जीवनात किती महत्त्वाचे आहे याविषयी मार्गदर्शन केले. तसेच फक्त योगा दिनाच्या दिवशीच योगासने करून चालणार नाहीत तरी तो एक आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनवला पाहिजे म्हणजेच योगासने प्रत्येकाने नियमित करावीत व त्याचा आपल्या जीवनात निश्चित फायदा होतो याविषयी मार्गदर्शन केले.
महाविद्यालयात योगा दिनानिमित्त प्रथम पूरक हालचाली, नंतर ताडासन, पाद-हस्तासन, अर्धवक्रासन, सूर्यनमस्कार, वज्रासन, शशांकसन, भुजंगासन, शलभासन, मकरासन, उत्तान-पादासन, अर्ध -हलासन, पवनमुक्तासन, अनुलोम-विलोम, कपालभाती, भ्रामरी, प्राणायाम, व ध्यान इत्यादी प्रात्यक्षिके पहिल्यांदा करून दाखवून नंतर विद्यार्थी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्याकडून सराव करून घेतला. योगासने व प्राणायाम प्रा.गाडेकर व्ही.एस. व प्रा. चेडे जे.वाय. यांनी करून दाखवली.
आंतरराष्ट्रीय योगा दिनाचा कार्यक्रम महाविद्यालयाच्या क्रीडाभवनामध्ये संपन्न झाला. यावेळी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.



