महाराष्ट्र

दादर–सातारा एक्सप्रेसचे चंद्रभागा एक्सप्रेस नामकरण करा :– अशोक कामटे संघटना

दादर –सातारा –दादर एक्सप्रेसला चंद्रभागा एक्सप्रेस नाव देऊन सातारा व दादरहून दररोज एक्सप्रेस सोडावी अशी मागणी शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेने केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, सोलापूर रेल्वे विभागाचे विभागीय व्यवस्थापक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे .

दादर येथून पंढरपूर, सांगोला, मिरज, सातारा– दादर एक्सप्रेस सुरू झाली. त्यामुळे प्रवाशांची मोठी सोय झाली. सातारावरून –दादरला जाताना सदर रेल्वे कुर्डवाडी जंक्शनवर पंधरा मिनिटाचा थांबा असताना सुमारे एक तास ही गाडी थांबवली जाते व सर्व रेल्वे गाड्या पुढे सोडल्या जातात जर या ठिकाणी एक तासाचे लूज मार्जिन असेल तर या गाडीस रहिमतपूर, आरग ,सलगरे, जवळा ,मोडनिंब या स्थानकावर थांबे मंजूर करावेत. त्यामुळे रेल्वेचे प्रवासी उत्पन्नही वाढेल .कुर्डूवाडीनंतर लोणावळ्यापर्यंत सर्वच थांबे या गाडीस मंजूर आहे, तर या ग्रामीण भागातील स्थानकावरून देखील स्टॉपेज मंजूर करणे गरजेचे आहे,त्यामुळे वारकरी,प्रवाशांची मोठी सोय होईल. व गाडी नियोजित वेळेतच पोहोचेल.

तसेच ही रेल्वे राज्याच्या राजधानी (मुंबई)पासून राज्याच्या तीर्थक्षेत्राची राजधानी पंढरपूर मार्गावर धावत असल्याने या गाडीस चंद्रभागा एक्सप्रेस नाव देण्यात यावे अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.

यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निलकंठ शिंदे सर, उपाध्यक्ष मकरंद पाटील, कार्याध्यक्ष प्रा. प्रसाद खडतरे, अनिल तारळकर, सचिन घाडगे, सुनील गावडे , बाळासाहेब टापरे यांच्यासह अशोक कामटे संघटनेचे सदस्य डी आर एम ऑफिसला निवेदन देतेवेळी उपस्थित होते.


मुळात कावेरी एक्सप्रेस, झेलम एक्सप्रेस, गोदावरी एक्सप्रेस, कोयना एक्सप्रेस, नर्मदा एक्सप्रेस, सतलज एक्सप्रेस अशा एक्सप्रेस असताना आपली तेवढी “चंद्रभागा एक्सप्रेस” नाही ही खंत वाटते तरी या गाडीचे नामकरन होणे आवश्यक आहे.वर्षातील सर्वात मोठा आषाढी एकादशी सोहळा सहा जुलै रोजी पंढरपुरात होत आहे त्यानिमित्ताने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महापुजेसाठी या निमित्ताने येत आहेत तरी त्यांनी या शुभ दिवशी सदर रेल्वेचे चंद्रभागा एक्सप्रेस नामांतरणास मंजुरी देऊन सदर रेल्वे दररोज सुरू करावी अशी समस्त वारकऱ्यांची मागणी आहे.
निलकंठ शिंदे सर
संस्थापक:– शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटना सांगोला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button