महाराष्ट्र

सांगोला विद्यामंदिरमध्ये अकरावी प्रथम फेरी प्रवेश उद्यापासून सुरुवात

सांगोला (प्रतिनिधी) शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे इ. ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक सत्र २०२५-२६ मधील इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने करण्याबाबत राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे. त्यानुसार यावर्षी संपूर्ण राज्यात इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश सर्वप्रथम करण्यात येत आहेत. त्यानुसार पहिल्या फेरीतील कॅप आणि कोटा अंतर्गत प्रवेशाच्या अनुषंगाने नियमित फेरी एक कॅप व कोटाअंतर्गत प्रवेशासाठी २८ जून २०२५ रोजी गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली आहे. ती यादी सांगोला विद्यामंदिर सांगोला येथे प्रदर्शित करण्यात आली आहे.

 

या प्रवेशयादीनुसार ज्यांना सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज प्रथम यादीमध्ये प्रवेशासाठी मिळाले आहे. त्या विद्यार्थ्यांनी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संचलित सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे सोमवार दिनांक
३० जून २०२५ ते ०७ जुलै २०२५ रोजी उपस्थित राहून प्रवेश निश्चित करावयाचा आहे.तसेच ०९ जुलै २०२५ रोजी दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा प्रदर्शित होणार आहेत त्यानुसार विद्यार्थ्यांनी कार्यवाही करावयाची आहे असी माहिती सांगोला विद्यामंदिर प्रशाला व जुनिअर कॉलेजचे प्राचार्य प्राचार्य अमोल गायकवाड यांनी दिली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button