धायटीं ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शेकापच्या सौ.आशा अविनाश सरगर यांची बिनविरोध निवड

धायटी ता. सांगोला ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शेकापच्या सौ. आशा अविनाश सरगर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.यावेळी कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून गुलालाची मुक्त उधळण करीत जल्लोष केला.
धायटी ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच श्री.रवी मेटकरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंच पदाच्या निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी मंडलाधिकारी व्ही . एम.नाईक मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली व तलाठी मोक्षदा यादव मॅडम आणि ग्रामसेवक सुमन लेंडवे मॅडम यांच्या उपस्थितीत रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी ग्रामपंचायत सदस्यांची सभा घेण्यात आली. त्यामध्ये सौ.आशा अविनाश सरगर यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सौ. व्हि.एम.नाईक मॅडम यांनी त्यांची बिनविरोध सरपंच पदी निवड झाली असे जाहीर केले.
यावेळी उपसरपंच दिपक काटे , ग्रामपंचायत सदस्य सौ .स्वाती नवनाथ येडगे,सौ.नंदा मोहन गेळे ,सौ.वनिता संजय कोळेकर,सौ.शांताबाई सिद्राम कदम शेकाप ज्येष्ठ नेते मोहन गेळे , रामा वाघमोडे ,दयानंद बनसोडे ,संजय कोळेकर,तानाजी सरगर,राहुल वाघमोडे,संतोष सरगर,गणेश गेळे,अविनाश सरगर,नवनाथ येडगे यांचे सह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते .



