महाराष्ट्र

जिल्हादंडाधिकारी यांचे आदेशाचा भंग करुन रास्तारोको; 71 जणांविरोधात सांगोला पोलीसांत गुन्हा दाखल

सांगोला(प्रतिनिधी):- नागपुर-गोवा शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पासाठी जमीनीचे होणारे संपादन रद्द करणे संदर्भात रस्ता रोको करून सांगोला-मिरज रोडवरुन जाणारे येणारे वाहनांना मज्जाव करून बेकायदा जमाव जमवुन जमावबंदी आदेशाचा तसेच धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करणेस निबंध असताना मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सोलापुर यांचे आदेशाचा भंग केला आहे. म्हणून सांगोला पोलीसांकडून 71 जणांविरोधात सरकारतर्फे भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 126(2), 189(2), 190, 223 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्याद गणेश कुलकर्णी यांनी सांगोला पोलीस स्टेशनला दिली आहे.

सांगोला पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, दिनांक 30/06/2025 रोजी शक्तीपीठ शेतकरी संघर्ष समिती, सागोला या समितीचे पदाधिकारी नागपुर-गोवा शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पासाठी लागणारे जमीनीचे भुसंपादना विरोधात रस्ता रोको करणार असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाला होती, मा.जिल्हादंडाधिकारी यांनी त्याचेकडील जावक क्रमांक 2025/डिसीबी-2/आर. आर.-3875 दिनाक 27/06/2025 अन्वये संपुर्ण सोलापुर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र पोलीस अधिनीयम 1951 चे कलम 37(1) चा आदेश जारी केल्यामुळे आम्ही संबंधीत पदाधिकारी व शेतकरी यांना दिनांक 30/06/2025 रोजी भारतीय नागरीक सुरक्षा संहीता 2023 चे कलम 168 प्रमाणे नोटीस देवुन कायदेशीर व सनदशिर मार्गाचा आवलंब करणेबाबत सुचना दिलेल्या होत्या. दिनांक 01 जुलै 2025 रोजी मी पोलीस ठाणेस हजर असतांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि, मौजे अनकढाळ ता. सांगोला येथील सांगोला मिरज नॅशनल हायवे क्रमांक 166 वरील टोलनाक्या जवळ शक्तीपीठ शेतकरी संघर्ष समिती, सांगोला या समितीचे पदाधिकारी व शेतकर्‍यांनी रास्ता रोको केला आहे. अशी माहिती मिळाल्याने मी व सोबत श्रेणी पोसई बगाडे, पोहेकों देवकर, पोहेका बनसोडे, पोहेकों घुले, पोकॉ कांबळे असे सर्वजन सदर ठिकाणी रवाना झालो. मौजे अनकढाळ येथील नॅशनल हायवे क्रमाक 166 वरील टोलनाक्याजवळ शेतकरी संघर्ष समिती, सांगोला या समितीचे पदाधिकारी व शेतकरी यांनी नागपुर-गोवा शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पासाठी लागणार्‍या जमीनीचे भुसंपादन रद्द करणे संदर्भात रस्ता रोको करून सांगोला-मिरज रोडवरुन जाणारे येणारे वाहनांना मज्जाव करून रास्तारोको आंदोलन केले व त्या ठिकाणी शक्तिपीठ करीता जमीनीचे भुसंपादन रद्द करणे संदर्भाने सरकार विरोधात मोठमोठ्याने घोषणा देत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

पोलीसांनी सदर रास्तारोको आंदोलनात 1)अँड सचिन देशमुख, 2) श्री दादासाहेब वाघमोडे, 3) प्रकाश सोळसे, 4) अँड शदर यादव, 5) रविराज शेटे, 6) देवा माने, 7) बाबासाहेब कोळेकर, 8) सागर बिले, 9) प्रवीण घोडके, 10) डॉ कन्हैया सोनवणे, 11) गुरुलिंग सोनवणे, 12) अल्लमप्रभु पाटील, 13) बसवलिंग पाटील, 14) संतोष पाटील, 15) प्रभाकर पाटील, 16) नवनाथ खंडागळे, 17) संभाजी पाटील, 18) सतिवन खंडागळे, 19) अरुण पवार, 20) बापु खंडागळे, 21) दत्तात्रय पवार, 22) संतोष पवार, 23) महादेव पवार 24) वसंतराव मोकाशी) 25) जितेद्र मोकाशी 26) युवराज खंडागळे 27) गणपती राये, 28) महादेव पवार, 29) हरिबु बनसोडे, 30) सतिश बनसोडे, 31) सुनिल कांबळे, 32) पोपट बनसोडे, 33) बबन बिले, 34) सुशांत बिले. 35) आनंदा शिंदे 36) बाळासो सरगर 37) शंकर गोरड, 38) संतोष गोरड, 39) आकाश जुदळे, 40) हरी देशपांडे, 41) मिलींद कांबळे, 42) राजु पाटील, 43) साहेबराव घोडके, 44) विठ्ठल आलदर, 45) महादेव सरगर 46) ब्रम्हदेव सरगर 47) धनराज खांडेकर, 48) प्रविण पाटील, 49) समाधान सरगर 50) शामराव बिले, 51) समाधान सरगर 55) नारायण मिसाळ, 56) रेवण विष्णु पवार, 57) विनायक बिले, 58) जननाथ सरगर, 59) हणमंत कोळेकर, 60) प्रविण घोडके, 61) राजेश बिले, 62) उदय कांबळे, 63) नवनाथ मिगरु, 64) महादेव आलदर 65) गजानन चव्हाण, 66) आकाश जगताप, 67) राजाराम आलदर, 68) दत्तात्रय कोळेकर, 69) जगनाथ आलदर, 70) आबादास सरगर 71) नितीन रणदिवे व इतर 20 ते 25 इसमांविरूध्द सरकारतर्फे भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 126(2), 189(2), 190, 223 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button