सांगोला विद्यामंदिरमध्ये अकरावी प्रथम फेरी प्रवेश ७ जुलै पर्यंत निश्चित करावा

सांगोला (प्रतिनिधी) सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे सोमवार दि.०७ जुलै २०२५ पर्यंत विद्यार्थ्यांनी प्रथम फेरी प्रवेश निश्चित करावयाचा आहे.तसेच इ.११ वी ऑनलाइन प्रवेशासाठी नवीन विद्यार्थी नोंदणी व अर्जाचा भाग -१ भरणे तसेच नियमित फेरी-१ मध्ये नोंदणी अपूर्ण असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अर्जाचा भाग-१ भरण्याची सुविधा संकेतस्थळावर दिनांक ०७ जुलै २०२५ सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत आहे.
त्याचबरोबर नियमित फेरी -२ मधील अर्जाचा भाग – २ म्हणजे कॉलेज पसंती क्रम देण्याची सुविधा दिनांक १० जुलै २०२५ ते दिनांक १३ जुलै २०२५ सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत कालावधी देण्यात येत आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी कार्यवाही करावयाची आहे. तसेच नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी कॉलेजमध्ये करून दिली जाईल अशी माहिती सांगोला विद्यामंदिर प्रशाला व जुनिअर कॉलेजचे प्राचार्य अमोल गायकवाड, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे यांनी दिली आहे



