महाराष्ट्र
आषाढी एकादशी निमित्त उत्कर्ष बालक मंदिर मध्ये पारंपारीक बालदिंडी सोहळा

उत्कर्ष बालक मंदिर मध्ये आषाढी एकादशीनिमित्त पारंपारिक भक्तीभाव आणि सांस्कृतिक उत्साहाने नटलेला बालदिंडी सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला या सोहळ्यामध्ये छोट्या वारकऱ्यांची संतांची वेशभूषा मनाला खूपच भावत होती पारंपारिक वेशभूषा ,टाळ ,भगवे पताके ,तुळशी वृंदावन आणि भक्ती गीतांच्या गजरात छोटे वारकरी व पालक सहभागी होते संपूर्ण परिसर विठ्ठलमय झाला होता
श्रद्धा भक्ती आणि एकतेच्या पावलांनी चालत पंढरपूरच्या वारीचा हा अनुभव प्रत्येकाला आयुष्यात नवी दिशा देतो आषाढी एकादशी ही सामाजिक एकतेचे प्रतीक मानले जाते या दिवशी लाखो भाविक पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनासाठी येतात याच भावनेने प्रेरित होऊन उत्कर्ष बालक मंदिर मध्ये बाल दिंडी सोहळा आयोजित करण्यात आली शाळेच्या मुख्याध्यापिका सौ संध्याताई शास्त्री व उपमुख्याध्यापिका शालनताई गयाळी यांनी पूजा करून सोहळ्याची सुरुवात केली शाळेच्या आवारात गोल रिंगण करण्यात आले होते
मध्ये विठ्ठल रखुमाई उभे केले होते विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला चालत आहे असे भासत होते दिंडी उत्साहात साजरी झाली शेवटी बालचमु वारकऱ्यांना गोड खाऊ देण्यात आला आणि दिंडीतील छोटे वारकरी विठ्ठलाच्या गजरात घरी आनंदाने गेले
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ संध्याताई शास्त्री इतर शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते पालकांचाही सहभाग मोठ्या प्रमाणात होता अशाप्रकारे छोट्या वारकऱ्यांची बाल दिंडी उत्साहात संपन्न झाली



