महाराष्ट्र

जलसंपदा विभागाचे क्षेत्रीय कार्यालय सांगोला येथे लवकरच होणार:- आमदार डॅा.बाबासाहेब देशमुख 

सांगोला तालुक्यातील एकूण जलसंपदा विभागाकडील प्रकल्प संख्या व सिंचन क्षेत्रांची गरज व येथील जलसंपदा विभागांशी संबंधित समस्यांचे त्वरित निराकरण व्हावे आणि स्थानिक पातळीवर जलसंपदा प्रकल्पांचे प्रभावी व्यवस्थापन व्हावे, यासाठी सांगोला येथे जलसंपदा विभागाचे क्षेत्रीय कार्यालय स्थापन करण्याची मागणी आमदार डॅा.बाबासाहेब देशमुख यांनी पत्राद्वारे जलसंपदा मंत्री मा.ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केलेली असून लवकरच क्षेत्रीय कार्यालय सांगोल्यात सुरू होणार असल्याची माहिती आमदार डॅा. बाबासाहेब देशमुख यांनी दिली.

सध्या या क्षेत्रातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना प्रशासकीय कामांसाठी दूरवरच्या कार्यालयात जावे लागते, ज्यामुळे वेळ आणि खर्च वाढतो. त्यामुळे क्षेत्रीय कार्यालय सांगोल्यात झाल्याने जलसंपदा प्रकल्पांचे स्थानिक पातळीवर नियोजन आणि अंमलबजावणी करणे तसेच सिंचन, पाणीपुरवठा यासंबंधी तक्रारींचे जलद निराकरण करणे तसेच स्थानिक शेतकरी आणि नागरिकांना तांत्रिक व प्रशासकीय सहाय्य त्वरित उपलब्ध होणार आहे. सांगोला तालुक्यात २० को.प बंधारे व १४ लघु पाटबंधारे तलाव आहे. या प्रकल्पांचे देखभाल दुरुस्ती व सिंचन व्यवस्थापनाचे कामकाज करणे यामुळे सोयीचे होणार आहे.

या अनुषंगाने सांगोला येथील जलसंपदा विभागाचे विभागीय कार्यालय होणे या आमदार डॅा. बाबासाहेब देशमुख यांच्या मागणीची त्वरित दखल घेवून जलसंपदा मंत्री मा.ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित विभागास सूचना देत लवकरात लवकर क्षेत्रीय कार्यालय सांगोला येथे सूरू करण्याबाबत अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले.मंत्री महोदयांनी तत्काळ अंमलबजावणीचे आदेश दिल्याने आमदार डॅा.बाबासाहेब देशमुख यांनी त्यांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button