महाराष्ट्र
सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात संपन

सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलमध्ये महर्षी वेद व्यास यांचा जन्मदिवस म्हणजेच ‘गुरुपौर्णिमा’ मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरूवातीला विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती शिल्पा ढाळे यांच्या हस्ते गुरूवर्य कै. बापूसाहेब झपके व महर्षी वेद व्यास यांच्या प्रतिमेस पुष्पहार समर्पित करण्यात आला.
यावेळी पूर्व प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कु. रोहिणी महारनवर,कु.सुकेशनी नागटिळक सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होत्या. यानिमित्ताने विद्यालयाच्या सहशिक्षिका कु. गोडसे यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त माहिती सांगितली तसेच विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गुरूविषयी महत्त्व सांगणारे एक नाटक सादर केले. यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांना गुलाबपुष्प देऊन गुरूप्रती आदर व्यक्त केला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सव विभाग प्रमुख कु.सुप्रिया देवकते व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. पल्लवी थोरात यांनी केले तर तसमीन मणेर यांनी शेवटी सर्वांचे आभार मानले.



