महाराष्ट्र

वाडेगाव प्रशाला वाडेगाव मध्ये माजी विद्यार्थी स्नेह मेळावा संपन्न .

दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी रविवारी एसएससी बॅच 2002 -2003 स्नेहा मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी सर्व माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते .तसेच त्यावेळी कार्यरत असणारे प्राचार्य माननीय शिवाजीराव साळुंखे सर सर्व शिक्षक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री रावसाहेब मेटकरी यांनी केले .त्याचबरोबर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अनिल दिघे व सोमनाथ वसमळे यांनी केले. सुरुवातीला विद्यार्थ्यांनी सर्व च गुरुजनांचे पुष्पवृष्टी करून स्वागत केले. श्री घोडके सर यांनी विद्यार्थ्यांची उपस्थितीची नोंद घेतली यावेळी 32 माजी विद्यार्थी उपस्थित होते. सुरुवातीला सर्व विद्यार्थ्यांनी- विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केली .त्यांनी आपल्या मनोगतातून आतापर्यंत जीवनातील यशस्वी प्रवास मांडण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच मित्र-मैत्रिणींची तब्बल 22 वर्षानंतर ची ही भेट होती त्यामुळे या भेटीची सर्वांना उत्सुकता होती. विद्यार्थी मनोगता नंतर सर्व गुरुजनाने सुद्धा आपली मनोगत व्यक्त केली .परमपूज्य उदयसिंह देशमुख (भैय्यू महाराज) प्रशाला या प्रशालेच्या विद्यमान प्राचार्या बागवान मॅडम यांनी शाळेच्या भौतिक सुविधेसाठी विद्यार्थ्यांनी मदत करण्याचे आवाहन केले. त्याला सर्व विद्यार्थ्यांनी प्रतिसाद  देऊन मदत करण्याचे अभिवचन दिले.

सर्व विद्यार्थ्यांनी खूप दिवसांनी एकमेकांची भेट झाल्यामुळे आनंद चेहऱ्यावर झळकत होता .सर्वांनी शालेय जीवनातील  कटू- गोड आठवणींना उजाळा दिला. पुन्हा एकदा शालेय जीवनातील अनुभवाची आठवणींना उजाळा देऊन पुनरावृत्ती केली. कार्यक्रमाची सांगता स्वादिष्ट अशा जेवण नंतर झाली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माननीय श्री अनिल दिघे मा. उपसरपंच वाडेगाव व सोमनाथ वसमळे ग्रामपंचायत सदस्य वाडेगाव यांनी परिश्रम घेतले .त्यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे स्नेहा मेळाव्याचा कार्यक्रम उत्तम रीतीने संपन्न झाला. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन दिपाली पाटील हीने मानले .यावेळी श्री .साळुंखे सर , श्री.भारत दिघे सर, श्री.सुभाष दिघे सर,बागवान मॅडम, श्री. घोडके सर , श्री. लोखंडे सर, श्री.जगताप सर, श्री .रोडगे सर, श्री.छगन दिघे सर , श्री.धनंजय दिघे व श्री.राम सराटे इत्यादी.सर्वजण उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button