सांगोला तालुकाशैक्षणिक

उत्कर्ष विद्यालयात स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

उत्कर्ष विद्यालयात 30 डिसेंबर रोजी स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचे उद्घाटन पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. सुनीता कुलकर्णी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ मागाडे मॅडम तसेच माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री कुलकर्णी सर तसेच पूर्व प्राथमिक विभागाच्या उपमुख्याध्यापिका व संध्याताई तसेच प्राथमिक विभागाच्या उपमुख्याध्यापिका सौ.स्वराली कुलकर्णी व माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक श्री मुक्तानंद मिसाळ सर व शाळेतील विद्यार्थी यांच्या हस्ते करण्यात आले होते

महाराष्ट्राची लोकधारा वर आधारित विद्यार्थ्यांनी विविध कला गुणदर्शनाचे सादरीकरण केले या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी वाघ्या मुरळी, जोगवा, गजी ढोल,  गोंधळ ,गरबा ,आदिवासी नृत्य,वारकरी दिंडी अशा महाराष्ट्रातील विविध कलांवर आधारित नृत्य करून प्रेक्षकांची मने जिंकली या कार्यक्रमास संस्थेच्या अध्यक्षा सौ. संजु ताई केळकर तसेच कोशाध्यक्षा सौ. शालू ताई व संस्थेतील इतर सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!