सांगोला विद्यामंदिर एस.एस.सी 1983 बॅच चे स्नेह मेळावा संपन्न

सांगोला – सांगोला विद्यामंदिर प्रशाला, सांगोला या शहरातील नामवंत शाळेच्या सन 1983 च्या बॅच चा स्नेह मेळावा रविवार दिनांक 25 डिसेंबर 2022 रोजी राम कृष्ण गार्डन येथे मोठ्या उत्साहात पार पडला. सुमारे चाळीस वर्षांपूर्वी निरोप घेतलेले मित्र मैत्रिणी या निमित्ताने एकत्र भेटले. सकाळी ठीक 9:30 वाजता नाश्ता व चहा बरोबर खमंग गप्पा सुरू झाल्या. ह्या बॅच चे विद्यार्थी अभियंता श्री तुकाराम माने, माजी सैनिक आनंद व्हटे, रवी घोंगडे, आनंद घोंगडे, सुनील लोखंडे, जावेद इनामदार ,श्री पोपट केदार, संजय गवळी, संजय पैलवान, रमेश नलवडे, राजू वालवाढकर त्याच बरोबर मुंबई येथील अॅड फिल्म मेकर ईराश नरुटे हे सहकारी व परगावाहून आलेल्या मोठ्या प्रमाणात महिला मित्रानी मेळाव्यास उपस्थित होत्या. नाश्ता व चहा नंतर संगीत खुर्ची हा महिलांचा आवडता खेळ घेण्यात आला. सर्वानी आपापले जीवनातील अनुभव एकमेकांना सांगितले.
दुपारी रुचकर गावरान जेवणाचे आयोजन करण्यात आले होते. बाजरीची भाकरी, ठेचा व धपाटे असा बेत केला होता. एकूणच धावपळीच्या व धकाधकीच्या जीवनात थोडा विरंगुळा म्हणुन असे गेटटुगेदर आयोजित करण्यात यावे ही काळची गरज आहे. ताण तणाव कमी होईल असे सर्वानी मत व्यक्त केले .शेवटी सर्व महाराष्ट्र भर प्रसिद्धी असणारी चट पट सांगोला भेळ व आईस क्रीम च्या कार्यक्रमा नंतर पुन्हा एकदा पुढच्या वर्षी लवकर भेटू या असे ठरवून कार्यक्रमांची सांगता झाली.