न्यू इंग्लिश स्कूल पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज सांगोला, वार्षिक स्नेहसंमेलन पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न..

सांगोला(प्रतिनिधी):-आपले भविष्य हे दारिद्र्याने गंजलेल्या परिस्थितीवर अवलंबून नसते तर आपल्यामध्ये असलेले सामर्थ्य व क्षमतेवर अवलंबून असते. आपण पराक्रमाच्या वयामध्ये जर पराक्रम केला नाही तर भविष्य अंधारमय झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या पाल्याला मिळालेले गुण म्हणजे त्याचे यश असे समजणार्या पालकांनी पाल्यामध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव दिला पाहिजे.विद्यार्थी दशेत असताना जिद्द व चिकाटी बाळगली पाहिज. विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजेत असे मत माजी सनदी अधिकारी इंद्रजीत देशमुख यांनी व्यक्त केले.
पारितोषिक वितरण समारंभाची सुरुवात प्रमुख पाहुणे माजी सनदी अधिकारी माननीय इंद्रजीत देशमुख व कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय चंद्रकांतदादा देशमुख, श्रीमती रतनबाई गणपतराव देशमुख यांच्या शुभहस्ते व संस्थाध्यक्ष श्री.रामचंद्र खटकाळे, संस्था सचिव श्री.विठ्ठलराव शिंदे, डॉ.बाबासाहेब देशमुख, संस्था सदस्य बबनराव जानकर, अवधूत कुमठेकर, प्रा.डॉ.अशोक शिंदे, प्रा.दीपक खटकाळे, प्रा.जयंत जानकर, प्राचार्य लक्ष्मण गावडे, मुख्याध्यापक दिनेश शिंदे, प्राचार्य रघुनाथ फुले, उपप्राचार्य प्रा.हेमंत आदलिंगे, उपमुख्याध्यापक श्री.रामचंद्र बेहेरे, पर्यवेक्षक प्रा.नामदेव कोळेकर, श्री.राहुल मोरे सर, श्री.दत्तात्रय पांचाळ सर, शिक्षक प्रतिनिधी प्रा.संजय शिंगाडे, आयोजन समितीचे प्रमुख प्रा.जालिंदर टकले, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.संतोष राजगुरू, शिक्षकेतर प्रतिनिधी श्री लक्ष्मण बनसोडे, माजी नगराध्यक्षा सौ.राणीताई माने, माजी उपनगराध्यक्ष श्री.सुरेश माळी, माजी नगरसेवक अॅड.भारत बनकर, गजानन बनकर, सौ.छायाताई मेटकरी, इंजि. मधुकर कांबळे, प्राचार्य विजय वाघमोडे, दत्तात्रय पांचाळ व इतर सर्व पदाधिकारी, माजी प्राचार्य कस्तुरे सर, माजी उपप्राचार्य डी.टी.गायकवाड, माजी पर्यवेक्षक मुरलीधर इमडे, भीमराव सरगर सर, बाबासाहेब रेड्डी सर, बाजीराव चौगुले सर, नारायण गोडसे, आबा होवाळ यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक यांच्या उपस्थितीत झाली.
आपल्या अध्यक्षीय मनोगत बोलताना माननीय चंद्रकांत दादा देशमुख म्हणाले की अशा विविध गुणदर्शन कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळतो ज्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेमध्ये यश मिळवलेले आहे अशा विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
या शैक्षणिक वर्षाच्या विद्यार्थ्यांनी शालेय व सहशालेय स्पर्धेमध्ये यश संपादन केले आहे अशा विद्यार्थ्यांना मधून प्राथमिक विभागातील विद्यार्थी प्रतिनिधी शिवम अण्णा जाधव व तृप्ती अनिल शिनगारे माध्यमिक विभागातून अथर्व माणिक मिसाळ व मोनिका सुभाष खंबाळे, ज्यु.विभागातून विकास मारुती मोटे व समीक्षा संतोष पवार जिमखाना विभागातून अजित वसंत जावीर व प्रणव किसन पवार यांची नियुक्ती करण्यात आली.
प्रारंभी प्रमुख पाहुण्यांचा परिचय ग्रंथपाल सौ अर्चना सलगर मॅडम यांनी केला.यावेळी प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते शालेय, सहशालेय व स्नेहसंमेलनातील विविध स्पर्धेमध्ये संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविकात प्राचार्य लक्ष्मण गावडे यांनी शैक्षणिक वर्षांमधील इयत्ता पहिली ते बारावी मधील विद्यार्थ्यांची संख्या सांगितली व जूनियर कॉलेज मधील विद्यार्थी संख्या ही जिल्ह्यातील विद्यार्थी संख्येच्या सर्वात जास्त असल्याचे सांगत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती दिली.
सूत्रसंचालन सौ.येडगे मॅडम, सौ.पाटील मॅडम, सौ.घोडके मॅडम, श्री.देशमुख सर यांनी तर आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री राजगुरू सर यांनी मानले.