संस्थापक अध्यक्ष अनिलभाऊ इंगवले यांना आयडॉल्स ऑफ सोलापूर डिस्ट्रिक्ट पुरस्कार प्रदान

सांगोलातील सुप्रसिद्ध उद्योजक सूर्योदय उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष व एलकेपी मल्टीस्टेटचे चेअरमन श्री अनिल भाऊ इंगोले यांना 2022 सालचा लायन्स क्लब इंटरनॅशनल या संस्थेच्या वतीने ग्रामीण भागामध्ये औद्योगिक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आयडॉल्स ऑफ सोलापूर डिस्ट्रिक्ट हा पुरस्कार गुरुवार दि 29 डिसेंबर रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहामध्ये डॉ नवल मालू यांच्या हस्ते सन्मानपूर्वक देण्यात आला
सन 2010 साली अनिल भाऊ इंगवले यांनी सहकारी मित्र डॉ बंडोपंत लवटे जगन्नाथ भगत गुरुजी सुभाष दिघे गुरुजी या तीन मित्रांना घेऊन मेडशिंगी सारख्या छोट्या गावामध्ये व्यवसायास सुरुवात करुन आज सांगोला शहरासह महाराष्ट्र व कर्नाटकामध्ये काम चालू असून अनेक लोकांच्या हातांना काम मिळवून दिले आहे सूर्योदय उद्योग समूहाच्या माध्यमातून सांगोला शहरांमध्ये सूर्योदय सुटिंग शूटिंग सूर्योदय लीलन हाऊस सूर्योदय ई बाईक सूर्योदय मोबाईल शॉपी सूर्योदय लीलन हाऊस सूर्योदय ज्वेलर्स तसेच सूर्योदय अर्बन व सूर्योदय अर्बन महिला एल के पी मल्टीस्टेट या संस्थांच्या व उद्योगाच्या निमित्ताने बेरोजगारीवर मात करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे आज सूर्योदय उद्योग समूहाच्या माध्यमातून 200 पेक्षा जास्त युवकांना नोकरीची संधी मिळवून दिली आहे यापुढील काळामध्ये ही विविध प्रकारच्या व्यवसायाच्या माध्यमातून अनेक नवयुकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा मानस यावेळी अनिल भाऊ इंगवले यांनी व्यक्त केला या पुरस्काराबद्दल अनिल भाऊ इंगवले यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे