महाराष्ट्र

*‌प्रा.धनाजी चव्हाण सूर्योदय फाऊंडेशनच्या जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित* 

सांगोला (प्रतिनिधी) आर्थिक क्षेत्र,कृषी,उद्योग, दुग्ध व्यवसाय, कापड, फर्निचर तसेच सूर्योदय मॉल सारख्या उद्योग आणि व्यवसायांमधून शेकडो तरुणांच्या हाताला काम देत अनेकांच्या जीवनात प्रकाशपर्व निर्माण करत संस्थापक अध्यक्ष अनिलभाऊ इंगवले यांचे मार्गदर्शनाखाली कार्यरत एक वेगळा आदर्श निर्माण करणाऱ्या व तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात व महाराष्ट्रात नावलौकिक प्राप्त केलेल्या सूर्योदय परिवार सांगोला आयोजित अहिल्यादेवी होळकर सभागृहात ज्येष्ठ नागरिक स्नेहमेळाव्यात सुर्योदय ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अनिलभाऊ इंगवले, प्रमुख पाहुणे डॉ.मच्छिंद्र सोनलकर यांचे हस्ते व सुभाष लऊळकर ,आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव, सूर्योदय ग्रुप संचालक सुभाष दिघे, डॉ.बंडोपंत लवटे, जगन्नाथ भगत गुरुजी यांच्या उपस्थितीत प्रा.धनाजी चव्हाण यांना सूर्योदय फाऊंडेशन जीवन गौरव पुरस्काराने सहकुटुंब सन्मानित करण्यात आले.

प्रा. प्रबुद्धचंद्र झपके सर यांच्या मार्गदर्शनाखाली लायन्स क्लब, महाराष्ट्र साहित्य परिषद व सांगोला मंदिर येथील सामाजिक, साहित्यिक व शैक्षणिक कार्य प्रमाण मानून प्रा.धनाजी चव्हाण यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यापूर्वी प्रा.चव्हाण यांचा तालुका, जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक, सामाजिक पुरस्काराने सन्मान झाला आहे.

या यशाबद्दल सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, खजिनदार शंकरराव सावंत, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके,संस्था कार्यकारिणी सदस्य विश्वैश झपके,सर्व संस्था सदस्य प्राचार्य अमोल गायकवाड, उपमुख्याध्यापिका शहिदा सय्यद, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, पर्यवेक्षक प्रदीप धुकटे ,उत्तम सरगर ,काकासो नरूटे व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रा.धनाजी चव्हाण यांचेअभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button