महाराष्ट्र

चैतन्य हास्य क्लबचा मरणोत्तर ह.भ.प पुरस्कार कै.बाळासाहेब तेली याना प्रदान..

कै.बाळासाहेब तेली यांचा प्रथम पुण्य दिन त्यांच्या कुटुबियानी अतिशय शोकाकुल परिस्थितीत साजरा केला…मागील वर्षी आषाढ महिन्यातील कामिका एकादशी दिवशी एका अपघातात त्यांचे निधन झाले… बाळासाहेब  हे धार्मिक वृत्तीचे असुन चैतन्य हास्य क्लबचे नियमित सद्स्य होते..पांडुरंग हे दैवत मानणार्या बाळासाहेब यांनी अनेक वेळा आळंदी ते पंढरपुर पायी वारी केली होती..चैतन्य हास्य क्लब मध्ये ते भक्तीगीत,अभंग,गाणी,प्रार्थना नेहमी सादर करत असत..त्यांची धार्मिक वृत्ती,पेहराव,भक्तिभाव पाहुन चैतन्य हास्य क्लबचे कार्याध्यक्ष डॉ.कृष्णा इंगोले यानी त्याना हरी भक्त पारायण हा पुरस्कार जाहीर केला होता..

कोरोना महामारी व अन्य कारणांमुळे हा पुरस्कार प्रदान करणे लांबणीवर पडले होते..मागील वर्षी चैतन्य हास्य क्लबच्या 21 व्या वर्धापनदिनी त्याना हा पुरस्कार सन्मानपूर्वक देण्याचे निश्चित करण्यात आले होते..मात्र दुर्दैवाने दिनांक 20 जुलै रोजी त्यांचा अपघात झाला व त्यानंतर उपचारा दरम्यान 31 जुलै रोजी कामिका एकादशी दिवशी त्यांचे निधन झाले…त्यामुळे त्यांच्या प्रथम पुण्यतिथीचे औचित्य साधून अतिशय दुख:द अंतकरणाने हा पुरस्कार त्यांच्या कुटुंबीयाकडे प्रदान करण्यात आला…

यावेळी पुरस्कार मजकूराचे वाचन सचिव प्रा.राजेंद्र ठोंबरे यानी केले..चैतन्य हास्य क्लबचे अध्यक्ष जगताप सर,कार्याध्यक्ष डॉ.कृष्णा इंगोले यांच्यासह अरविंद डोंबे,सुभाष महिमकर,सुधाकर म्हेत्रे,मिलिंद पतंगे,अशोक जाधव,चंद्रकांत जाधव, प्रताप इंगोले,नारायण विसापुरे,बाळासाहेब वाघमारे,मल्लिकर्जुन घोंगडे,भागवत पैलवान आदि उपस्थित होते..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button