महाराष्ट्र

माजी सैनिकांच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी एसबीआय बँके मार्फत बैठक संपन्न

सांगोला (उत्तम चौगुले):: स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत माजी सैनिकासाठी त्यांच्या अडीअडचणी सोडवणे तसेच बँकेचे नवीन काही आलेले योजना याची माहिती देण्यासाठी माजी सैनिकांची मिटींगचे आयोजन करण्यात आले होते.

सदर मीटिंगसाठी चीप मॅनेजर उत्तमराव गावडे साहेब सर्विस मॅनेजर पाटील मॅडम आणि लोन डिपार्टमेंटच्या शिंदे मॅडम यांनी माजी सैनिकांना येत असलेल्या अडचणी याविषयी प्रश्नोत्तर स्वरूपात मार्गदर्शन केले. सैनिकांना नवीन वेगवेगळ्या योजना जसे एक्सीडेंटल इन्शुरन्स प्रतिवर्ष दोन हजार रुपये प्रत्येकाने आपला करावा जेणेकरून आपली फॅमिली सुरक्षित राहील याविषयी विशेष भर दिला आणि ही योजना प्रत्येकानी ज्या ज्या बँकेत आपली पेन्शन असेल त्या त्या बँकेत आपल्या पेन्शन खात्याला करून घ्यावी जेणेकरून आपल्या पेन्शन मधून वर्षाला ही रक्कम त्या त्या इन्शुरन्स ला जमा होऊन आपण सुरक्षित होऊ तसेच पेन्शन लोन ,कार लोन, होम लोन या योजनांची सविस्तर माहिती दिली.

 

डीएसपी गोल्ड खाते आपले बँक खाते असावे आणि ते नसेल तर करून घ्यावे तसेच नॉमिनेशन प्रत्येक खात्याला असावे ,फॅमिली चे जॉइंट अकाउंट असावे असेच कुठल्याही अडचणीसाठी आपण त्या त्या विभागांच्या विभाग मॅनेजरला भेटून आपले अडचणी सोडवू शकता आणि आपले काम मार्गी लावू शकता. असेच प्रत्येक दोन तीन महिन्याला पेन्शन धारकांना वेळोवेळी येणाऱ्या योजनांची माहिती देण्याविषयी मीटिंग घेण्यात येईल सुसंवाद नेहमीच होत राहील असे बँकेचे चीफ मॅनेजर उत्तमराव गावडे साहेब यांनी सांगितले

.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button