स्व.भाई गणपतराव देशमुख यांची पुण्यतिथी व जयंती सामाजिक उपक्रमांनी साजरी होणार

सांगोला (प्रतिनिधी):- सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते स्व.भाई गणपतराव देशमुख यांची पुण्यतिथी व जयंती सामाजिक उपक्रमानी साजरी करण्यात येणार आहे. पुण्यतिथी व जयंतीनिमित्त रक्तदान शिबिरे, शासकीय दाखले वाटप, महा आरोग्य निदान शिबिरे, वृक्षारोपण, वही वाटप, शैक्षणिक साहित्य वाटप, खाऊ वाटप, शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, शालेय स्पर्धा, फळ लागवड, निंबध स्पर्धा, शिलाई मशीन वाटप आदी सामाजिक उपक्रम राबबिण्यात येणार आहेत. स्व.आबासाहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त 30 जुलै रोजी कीर्तन, पुष्पवृष्टी, महाप्रसाद कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून 30 जुलै ते ते 9 ऑगस्ट या दरम्यान सांगोला तालुक्यातील गट वाईज विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
स्व. भाई गणपतराव देशमुख यांच्या पुण्यतिथी व जयंती नियोजन संदर्भात विचार विनीमय करण्यासाठी आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत काल बुधवार दि. 23 जुलै रोजी दुपारी डॉ. भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सुत गिरणी मर्या. सांगोला येथे बैठक संपन्न झाली.
यावेळी आम.डॉ.बाबासाहेब देशमुख, डॉक्टर प्रभाकर माळी, श्री.बाळासाहेब एरंडे, श्री.मारुतीआबा बनकर, अवधुत कुमठेकर, श्री.सुरेशआप्पा माळी, श्री.विजय राऊत, श्री.गिरीश गंगथडे, श्री.किसन माने, श्री.गजेंद्र कोळेकर, श्री.समाधान पाटील, माणिक वाघमारे, इंजि.रमेश जाधव, तुकाराम भुसनर, प्रशांत वलेकर, आशांक चांदणे, संगमआप्पा धांडोरे, मायाप्पा यमगर, सिताराम सरगर, आबा आलदर, निलकंठ लिंगे सर, आनंदा यमगर, बाळासाहेब बनसोडे, अंकुश येडगे, श्रीमती कल्पनाताई शिंगाडे, सौ.वंदनाताई बाबर, डॉ.उषा देशमुख यांच्या सह सर्व सहकारी संस्थाचे सभापती, उपसभापती, चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक, सरपंच, उपसरपंच त्याच प्रमाणे पक्षाचे व पुरोगामी युवक संघटना कार्यकर्ते पदाधिकारी, महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी डॉ.प्रभाकर माळी, श्री.बाळासाहेब एरंडे, श्री.दादाशेठ बाबर,श्री.गजेंद्र कोळेकर,श्री.संतोष देवकते, श्री.किसन माने सर, श्री.नवनाथ बंडगर, श्री.दिपक गोडसे यांनी आपले मनोगत व्यक्त करून स्व.आबासाहेब यांची पुण्यतिथी व जयंती सामाजिक उपक्रम राबवून साजरी करणार असल्याचे सांगितले.प्रास्ताविक चिटणीस दादाशेठ बाबर यांनी केले.सूत्रसंचालन नवनाथ बंडगर यांनी तर सर्वांचे स्वागत व आभार आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी मानले.



