महाराष्ट्र
प्रसिद्ध पंचांग व ज्योतिष तज्ञ मधुकर कुलकर्णी यांचे निधन

महूद, ता.२५ : चिकमहूद (ता.सांगोला) येथील दत्तभक्त, प्रसिद्ध पंचांग व ज्योतिष तज्ञ मधुकर रघुनाथ कुलकर्णी(वय ८३) यांचे निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी,भाऊ, दोन मुले,सुना,दोन मुली, पुतणे,नातवंडे असा परिवार आहे.
पंचांग व ज्योतिष तज्ञ म्हणून मधुकर कुलकर्णी हे महाराष्ट्रभर प्रसिद्ध होते. राज्याच्या विविध भागांमध्ये धार्मिक कार्यक्रमांसाठी त्यांनी महाराष्ट्रभर भ्रमण केले होते.त्यांचे निधनमुळे चिकमहूद व महूद परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.



