महाराष्ट्र
उपसरपंच रविराज शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बलवडी येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन- विद्यार्थी शिवसेनाप्रमुख अजिंक्यराणा शिंदे

नाझरे जिल्हा परिषद गटाच्या वतीने बलवडी ता. सांगोला गावचे उपसरपंच रविराज रमेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिर, भव्य रक्तदान शिबिर व मोफत नेत्र तपासणी, मोफत चष्मे व मोतीबिंदू ऑपरेशन इ. शिबिराचे जि.प. प्रा. शाळा बलवडी येथे आयोजन केले असल्याचे विद्यार्थी शिवसेना तालुकाप्रमुख अजिंक्यराणा शिंदे यांनी सांगितले.
सदर शिबिर सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत आयोजित केले आहे व यामध्ये स्त्री रोग, बालरोग, अस्थिरोग, हृदयरोग तज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार आहेत तरी नाझरे जिल्हा परिषद गटामधील सर्व नागरिकांनी व बलवडी ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच ज्ञानेश्वर माऊली राऊत यांनी केले आहे.



